NMU News esakal
जळगाव

NMU News: विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षांचा ‘विधी’ चुकला? अंतिम वर्षासह स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी संभ्रमात

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विधी शाखेच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या परीक्षांची तारीख जाहीर केली. २२ मेपासून परीक्षांना सुरवात होत असून, गेल्या वर्षीचे काही पेपर आणि अंतिम वर्षाचे पेपर एकाच वेळेस, एकाच तारखेला आहेत.

स्पर्धा परीक्षांच्या तारखाही महिनाअखेरीस असल्याने या नियोजित परीक्षांच्या वेळापत्रकाचा विधीच चुकल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. (Students confused about timetable of law exam competitive exam with final year students jalagon news)

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे जानेवारी महिन्यातच परीक्षा घेण्यात आली व मार्च महिन्यात या परीक्षांचा निकाल लागला. विद्यापीठाने जाहीर केलेल्या निकालानुसार जळगाव-धुळे-नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या अधिक असून, विद्यार्थ्यांनी या निकालावरच आक्षेप नोंदवून मोर्चा काढून कुलगुरूंना निवेदन दिले.

विद्यापीठातर्फे पेपर तपासणीवरच आंदोलक विद्यार्थ्यांनी शंका उपस्थित केली. पुर्नतपासणी शुल्क आणि फोटो कॉपी मिळविण्यासाठी आकारले जाणारे शुल्क, परीक्षा फीपेक्षाही अधिक असल्याचे आंदोलक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

पास-नापास अन्‌ पुन्हा परीक्षा

विद्यापीठात ६८४ विद्यार्थ्यांनी पेपर फेरतपासणीसाठी अर्ज दाखल केले हेाते. या फेर तपासणीचा अर्ज करतानाच परीक्षा फॉर्म भरण्याची वेळ असल्याने परीक्षा फॉर्म भरले, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांनी फेरतपासणीसाठी अर्ज केले.

फेरतपासणीचे निकाल येण्यापूर्वीच पुढच्या सेमिस्टरच्या परीक्षांची तारीख जाहीर झाली. २२ मेपासून परीक्षांना सुरवात होत असून, विद्यार्थ्यांचाही पुरता गोंधळ उडला आहे. कारण पुर्नतपासणीत ही अनुत्तीर्ण झाले, तर या लेखी परीक्षा द्याव्याच लागणार आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

उत्तीर्ण झाले, तर मग भरलेले शुल्क परत मिळेल काय, असाही प्रश्न विद्यार्थी उपस्थित करीत आहेत. दोन्ही सेमिस्टरची परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांकडे पुरेसा वेळ नसल्याने परीक्षा उशिरा घ्याव्यात, अशी मागणी ‘मासू’ संघटनेने केली आहे.

प्रॅक्टीकल्स संपेना, अभ्यास होईना

विधी अभ्यासक्रमाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षासाठी असलेले बहुतांश प्रॅक्टीकल्स हाताने लिहायचे आहेत. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी मूट कोर्ट जर्नल्स, डीपीसी जर्नल्स, कोर्ट डायरी-ऑफीस डायरी, कायदाविषयक शिबिरांचा अहवाल, निबंधलेखन, असे सर्व प्रॅक्टीकल्स हे स्वतः लिखाण करून येत्या १० मेपर्यंत महाविद्यालयात जमा करावे लागणार आहे.

प्रॅक्टीकल्सचे लिखाण काम, स्पर्धा परीक्षांची तयारी अन्‌ त्यात महिना अखेरच पुन्हा लेखी परीक्षेच्या तारखा आल्याने विद्यार्थ्यांवर अतिरीक्त ताण लादला जात असल्याची विद्यार्थ्यांची भावना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : खड्ड्यांनी ठप्प वाहतूक! करंजाळी घाटात बससह चार वाहने अडकली

SCROLL FOR NEXT