doctor esakal
जळगाव

रावेर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांअभावी रुग्णांचे हाल

रावेर ग्रामीण रुग्णालयात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांचे उपचारादरम्यान हाल होत आहेत

सकाळ वृत्तसेवा

रावेर (जि. जळगाव) : येथील ग्रामीण रुग्णालयात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांचे उपचारादरम्यान हाल होत आहेत तर मृत्यूनंतर देखील शवविच्छेदन करण्यासाठी मुक्ताईनगर जावे लागत असल्याने मृतदेहाचीही हेळसांड होत आहे.

येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. एन. डी. महाजन यांच्या बदलीनंतर येथे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी मिळालेला नाही. आरोग्य विभागातच वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने ही समस्या निर्माण झाली असल्याचे सांगितले जाते. या पदाची नवीन भरती प्रक्रिया सुरू आहे, ती पूर्ण झाल्यावर हा प्रश्न सुटणार आहे. मात्र, तोपर्यंत येथील रुग्णांचे हाल होत आहेत. सध्या या रुग्णालयात शालेय आरोग्य तपासणी पथकातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स दैनंदिन रुग्णतपासणी करीत आहेत. सामान्य रुग्णांवर हे कनिष्ठ व सहकारी डॉक्टर्स, नर्स उपचार करतात. मात्र गंभीर रुग्ण आल्यावर मुक्ताईनगर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला जातो व त्यांच्या निर्देशानुसार उपचार केले जातात.

अपघात, विषप्राशन करून किंवा संशयास्पद मृत्यू झाल्यास शवविच्छेदन करावे लागते. त्यासाठी मृतदेह मुक्ताईनगरला न्यावा लागतो. रावेर येथे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी मिळावा म्हणून आमदार शिरीष चौधरीही वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांशी संपर्क साधून आहेत. जिल्ह्यात एक जरी नवे वैद्यकीय अधिकारी मिळाले तरी त्यांची नियुक्ती रावेर येथे करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी सांगितले. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रश्नी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होताच सर्वप्रथम रावेर येथे देण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात, ‘हप्ता वसुली 2.0’च्या मुद्य्याने तापलं वातावरण

Locker Vastu Tips: तिजोरी ठेवण्याची योग्य दिशा कोणती? संपत्ती वाढवण्यासाठी 'हे' वास्तू नियम करा फॉलो

Pune News : पतंग उडवण्याचा आनंद ठरला जीवघेणा; कात्रजमध्ये सहाव्या मजल्यावरून पडून १२ वर्षीय मुलाने गमावला जीव!

Ram Temple: अयोध्येत राम मंदिर परिसरात नमाज पठण करण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून अटक, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : "कोणत्याही प्रकारचा भेदभाव असता कामा नये" - मोहन भागवत

SCROLL FOR NEXT