esakal
जळगाव

Jalgaon News : महामार्ग शेजारी वृक्षारोपण केवळ नावालाच? सावलीसाठी झाडच नाही

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यात यंदा ‘अल निनो’ च्या प्रभावामुळे उन्हाळा अतिशय उष्णतेत गेला. जिल्ह्याचे तापमान तब्बल ४७ अंशापर्यंत पोचले होते.

जिल्ह्यात तरसोद ते चिखली, तरसोद ते फागणे दरम्यान सुरू असलेल्या महामार्ग चौपदरीकरणात अनेक वृक्ष तोडली गेली. त्यामुळे तापमानात दरवर्षी वाढ होत आहे. (no trees on highway jalgaon news)

महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी वृक्ष लागवड केल्याचे आकडेवारी देतात. मात्र झाडे कोणती ते सांगत नाहीत. आपल्याला आपल्या परिसरातील तापमान रोखायचे असेल तर नागरिकांनीच पुढाकार घेत किमान आपल्या परिसरात पाच वृक्ष लावून ती लोक चळवळ करण्याची गरज निर्माण झाली आहे.

तरसोद ते चिखली दरम्यान महामार्गावर चौपदरीकरण होण्यापूर्वी अतिशय मोठे डेरेदार वृक्ष होती. गेल्या पाच वर्षात डेरेदार वृक्षांची कत्तल करून चौपदरीकरण करण्यात आले. आता तरसोद ते फागणे दरम्यान चौपदरीकरण सुरू आहे.

त्यातील अनेक वृक्षांची कत्तल झाल्याने महामार्गावरून जाताना उष्ण वाफा लागतात. झाडांच्या कत्तलीच्या बदल्यात तोडलेल्या झाडांच्या दुप्पट झाडे लावणे अपेक्षीत असते.

मात्र महामार्गाचे अधिकारी किती झाडे तोडली याची आकडेवारी देत नाही, लावलेल्या झाडांची आकडेवारी देतात. ती झाडे फुलझाडे आहे. डेरेदार वृक्ष अन फुलझाडांची बरोबरी होऊ शकत नाही. जिल्हा प्रशासनही त्याकडे दुर्लक्ष करते. वनविभाग दरवर्षी लाखो वृक्ष लावल्याचा सांगते. त्यापैकी किती जगवले याची माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नसते. सर्व झाडे कागदावर असतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वाढते तापमान रोखण्यासाठी नागरिकांनी कर्तव्य म्हणून पुढाकार घेत घराच्या परिसरात किमान पाच झाडे लावण्याची गरज आहे. ती लावून संवर्धनाची काळजी घेतली तरच आगामी काळात जळगावच्या तापमानाचा पारा कमी असेल.

शासनाची झाडे लावण्याची जबाबदारी सांगितल्यास, येणाऱ्या पिढीसाठी आपण डेरेदार वृक्षांची सावली केवळ पुस्तकात दाखवू शकू. याचा विचार करीत पर्यावरण दिनानिमित्त प्रत्येकाने झाडे लावून जगविण्याचा संकल्प करूया. असे त्यांनी नमूद केले.

"विकास कामांच्या नावाखाली जिल्ह्यात प्रचंड वृक्षतोड झाली आहे. महामार्ग प्राधिकरणाने झाडे लावली नाही. यामुळे तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन पर्यावरणाचा समतोल कसा राहील यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. नागरिकांनी घराभोवती, मोकळ्या जागेत किमान पाच झाडे लावावीत."- गोपाळ चौधरी, पर्यावरणप्रेमी, शिक्षक

"तापमान वाढीवर वृक्षाची लागवड करून संवर्धन करणे हाच मोठा पर्याय आहे. प्रत्येक नागरिकांनी आपले कर्तव्य समजून वृक्ष लागवड केली पाहिजे. तरच आगामी काळात तापमानात कमी होण्यास मदत होईल. वृक्ष तोड कोणी करीत असेल तर वन्य जीव रक्षकांना कळवावे." - बाळकृष्ण देवरे सचिव, वन्यजीव संरक्षण संस्था.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT