Sharad Pawar  esakal
जळगाव

शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल; दोघांविरुद्ध गुन्हा

पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी फेसबुकधारकांविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह फोटो टाकून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोन फेसबूक युजर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्‍हा साबर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आक्षेपार्ह फोटो व मजकूर अंकित पाटील आणि हरीश कोळी या नावाच्या फेसबुक युजर्सने टाकून ते व्हायरल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काही एक कारण नसताना शरद पवार यांची जनमानसात प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने दोघांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली असून शिवाय या पोस्टवर शिवीगाळ देखील करण्यात आली आहे. घडल्या प्रकाराची गंभीर दखल घेत जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत दोन फेसबूक धारकांविरोधात तक्रार दिली. पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी अंकित पाटील आणि हरीश कोळी नावाच्या फेसबुकधारकांविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT