Traffic News esakal
जळगाव

Jalgaon News : पारोळातील महामार्गावर वाहतुकीचा कोंडमारा

सकाळ वृत्तसेवा

पारोळा : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर कजगाव नाका सोडला तर इतर ठिकाणी वाहतूक पोलिस नसल्याने विशेषतः सकाळी अकरापासून वाहतुकीचा कोंडमारा होत असतो. भर रस्त्यावर मोठमोठे वाहने थांबत असल्याने प्रवाशांसह वाहनधारकांची तारांबळ उडते.

अपघाताची एखादी गंभीर घडण्याची वाट न पाहता, पोलिस प्रशासनाने या महामार्गालगतच्या चौफुलीवर तत्काळ वाहतूक पोलिसांची नियुक्ती करुन वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.

सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये- जा सुरु असते. रविवारी आठवडे बाजार व लग्नाची मोठी तारीख आल्याने या महामार्गावर वाहनांची अक्षरशः रिघ लागली होती. (On Highway in Parola Traffic jam problems Jalgaon News)

बऱ्याच वऱ्हाडी मंडळींना तसेच वर- वधूंना वाहनांचा गर्दीतून मार्ग काढत जावे लागले. धरणगाव चौफुलीपासून ते धुळे रोडवर अमळनेरपर्यंत वाहनांची प्रचंड वर्दळ असते. या रस्त्यावर चोरवड नाका, कजगाव चौफुली, एन. एस. हायस्कूल, अमळनेर रस्ता अशा चौफुली आहेत.या सर्वच चौफुलींवर परिसरातून ये- जा करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. पोलिस प्रशासनातर्फे कजगाव नाका चौफुलीवरच वाहतूक शाखेचा पोलिस कर्मचारी असतो. त्यामुळे इतर चौफुल्यांवर वाहनांची गर्दी झाल्यानंतर महामार्गाचा अक्षरशः कोंडमारा होतो.

या सर्व चौफुलींवर वाहनधारक देखील नियमांचे उल्लंघन करून मध्येच मार्गक्रमण करीत असतात. त्यामुळे आणखीनच गोंधळ उडतो. अशताच बरेच दुचाकीचालक मनमानी करीत गर्दीतून वाहने काढण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळे महामार्गावर वाहनांची अक्षरशः रिघ लागते. बस स्थानकालगत खाजगी वाहनांची महामार्गावरच गर्दी होत असल्याने ये जा करणाऱ्या वाहनांची दमछाक होते. एकूणच या सर्व प्रकारामुळे वाहतुकीचा कोंडमारा होण्याची ही समस्या कायमचीच झाल्याने वाहतुकीत सूसुत्रता आणण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

"गेल्या अनेक वर्षांपासून छावा संघटना सामाजिक बांधिलकीतून शहरात कामे करीत आहे. या भावनेतून महामार्गावरील सध्या वाहनांसह प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता, पोलिस प्रशासनाने लक्ष द्यावे. किमान दोन ते तीन चौफुलींवर एक- एक वाहतूक पोलिस कर्मचारी तैनात केली तरी देखील वाहतुकीची कोंडी होण्याची समस्या सुटू शकते, अशी आमची मागणी आहे."

- विजय पाटील, तालुकाध्यक्ष : छावा संघटना, पारोळा

ब्रिटिश काळापासून पारोळा पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही. त्यामुळे आहे ते कर्मचारी प्रामाणिकपणे काम करीत आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा बायपास लवकर सुरू झाला तर वर्दळीचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे हा प्रश्‍न सुटणे महत्त्वाचे आहे. महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी आमचे कर्मचारी आहे त्या परिस्थितीत सर्वार्थाने प्रयत्न करीत असतात.

- रामदास वाकोडे, पोलिस निरीक्षक : पारोळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: 'सीएम'पदासाठी भाजपात पक्ष विलिन करण्याची शिंदेंची तयारी - संजय राऊतांचा टोला!

IND vs ENG 3rd Test: रिषभ पंतने २५ मिनिटं नेट्समध्ये फलंदाजी केली, पण...! जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स, Video

Pune ISIS sleeper cell: मोठी बातमी! पुणे ‘इसीस स्लीपर सेल मॉड्युल’ प्रकरणी अकरावी अटक; तीन लाखांचा होता इनाम!

SCROLL FOR NEXT