money Transfer esakal
जळगाव

अबब! अचानक अकाउंटला आले लाख रुपये अन्...

दगडू पाटील

धरणगाव (जि. जळगाव) : मुलाने पाठवलेले पैसे दुसऱ्याच्या खात्यात जमा झाले आणि ते तातडीने परत मिळाले, अशावेळी होणारा आनंद हा महान असतो, याचा प्रत्यय येथे आला. संजय तोडे यांनी प्रामाणिकपणे आपल्या खात्यावर आलेली रक्कम बांभोरी येथील महिलेला परत केली. तोडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

येथील संघाचे कार्यकर्ते तथा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे कर्मचारी संजय तोडे यांच्या युनियन बँक खात्यात १ लाख ९ हजार ९०० रुपये जमा झाले, असा मेसेज त्यांना आपल्या मोबाईलवर आला. श्री. तोडे यांना हे कळताच त्यांनी बँकेत संपर्क साधला व कुणीतरी आपल्या खात्यात चुकून पैसे टाकले आहेत, असे शाखा व्यवस्थापक व बँक कर्मचाऱ्यांना कळविले. ही रक्कम लक्ष्मण सूर्यवंशी (रा.बांभोरी) ह. मु. पुणे) यांनी आपल्या आईसाठी पाठविले होते.

मात्र खाते क्रमांक चुकल्यामुळे श्री. सूर्यवंशी यांच्या आईच्या खात्याऐवजी संजय तोडे यांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. मात्र आईला पैसे मिळाले नाहीत, असे समजल्यावर श्री. सूर्यवंशी यांनी तपास करून श्री. तोडे यांना संपर्क केला असता तोडे यांनी आधीच बँकेला माहिती दिली असल्याचे सांगितले. शिवाय, काळजी करण्याचे काही कारण नाही, तुमचे पैसे तुम्हाला मिळतील, असा विश्वास दिला व पुष्पावती फकिरा सूर्यवंशी यांच्या नावाने आपल्या खात्यातून त्या रकमेचा धनादेश बनवून त्यांना परत केले. हे बघून प्रामाणिकपणा अजून जिवंत आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: गर्भवती असतानाही Mains दिली; 26 दिवसांच्या बाळाला कडेवर घेऊन मुलाखत दिली अन् थेट DSP झाली!

स्टेशनवर गर्दी, ट्रेनमध्ये चढण्याऐवजी वृद्ध थेट इंजिनवरच उभा राहिला; VIDEO VIRAL

जरागेंच्या उपोषणाचा १० वा दिवस, प्रकृती खालावल्यानं मराठा बांधवांचा सरकारला इशारा | Jarange Patil

Marathi News Live Updates : सर्वोच्च न्यायालयाने अरावली पर्वताबाबत अहवालाची मुदत वाढवण्याची याचिका फेटाळली

Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या चार तालुक्यांचा होणार कायापालट; आकांक्षित तालुका योजनेत प्रत्येकी ५ कोटींचा अतिरिक्त निधी

SCROLL FOR NEXT