online fraud esakal
जळगाव

Flipcart च्या कस्टमरला तक्रार भोवली; खात्यावर पडला डाका

पार्सलबाबत तक्रार करण्यासाठी एका तरुणीने त्यांच्या कस्टमर केअरवर संपर्क साधला.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : फ्लिपकार्टच्या (Flipkart) पार्सलबाबत तक्रार करण्यासाठी एका तरुणीने त्यांच्या कस्टमर केअरवर संपर्क साधला. तक्रारदार तरुणीला विश्‍वासात घेत तिच्या बँक खात्याचे डिटेल्स विचारुन ४० हजारात फसवणूक केल्याची घटना घडली. जिल्हापेठ पोलिसात या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील दंगलग्रस्त कॉलनीतील कौनिक शेख जाहिद (वय १८) या विद्यार्थीनीने फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरुन साहित्य खरेदी केले. त्याचे पार्सल २ जून रोजी पत्त्यावर पोहचले. त्या तरुणीने पार्सलची कस्टमर केअरकडे तक्रारीसाठी संपर्क केला. यावेळी त्यांच्याकडून कौनिक यांना

तक्रारीसाठी वेगळाच क्रमांक देण्यात आला. या क्रमांकावर त्यांनी तक्रार केली असता तक्रार करणाऱ्‍याने त्यांना विश्‍वासात घेत त्यांच्याकडून बँक खात्याची संपूर्ण माहिती जाणून घेतली. आणि काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून ३९ हजार ५०० रुपये ऑनलाईल पद्धतीने लंपास करुन घेत त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी कौनिक शेख जाहिद यांच्या तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT