fraud esakal
जळगाव

Jalgaon Online Fraud : यू-ट्यूब Subscriptionच्या नावे 3 लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील भोईटेनगरमधील रेल्वे कर्मचाऱ्याला यू-ट्यूब सबस्क्रीप्शनवर ५० व १५० रुपये रिफंडचे आमिष देत तब्बल दोन लाख ९४ हजार ५०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. (Online fraud of Rs 3 lakh by offering refund on YouTube subscription jalgaon fraud crime )

मनोजकुमार सुनहरीलाल राज (वय ४५) यांना सोमवारी (ता. ८) एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲप मेसेज आला. त्यात यू-ट्यूब लिंकवर सबस्क्रीप्शन केल्यास आपल्याला प्रत्येकी ५० व दीडशे रुपये मिळतील, अशी बतावणी केली होती.

त्यानंतर मनोजकुमार यांनी लिंकला सबस्क्रीप्शन केले असता भामट्याने टेलिग्रॅमच्या आयडीवर ग्रुप जॉइन करून घेतला. त्या ग्रुपमध्ये ८ ते ११ मेदरम्यान केलेले सबस्क्रीप्शनचे एकूण चार हजार ३५० रुपये दिले. त्यानंतर मनोजकुमार यांनी सांगितलेल्या बँक खात्यात पैसे पाठविले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नंतर वेगवेगळी कारणे सांगून मनोजकुमार यांच्याकडून सुमारे दोन लाख ९४ हजार ५०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मनोजकुमार राज यांनी मंगळवारी (ता. १६) रात्री अकराला दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक विजय ठाकूरवाड अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT