Cotton Crisis esakal
जळगाव

Jalgaon News : कापसाअभावी केवळ 50 टक्के जिनिंग सुरू; प्रेसिंग व्यवसाय तोट्यात

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात कापसाची टंचाई निर्माण झाल्याने जिल्ह्यातील दीडशेपैकी केवळ ७५ जिनिंग प्रेसिंग मिल्स सुरू आहेत. त्याही केवळ एका पाळीत. कापसाच्या गाठी तयार करून त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी नाही. गाठी तयार करून कोणाला विकणार, असा प्रश्‍न जिनिंग चालकांसमोर आहे. एकंदरीत बाजारपेठेत येणारा कापूस बंद झाल्याने कापसाअभावी जिनिंग व्यवसाय धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. (Only 50 percent ginning started due to lack of cotton Pressing business loss Latest Jalgaon News)

कापसाला मागील वर्षी १३ ते १४ हजारांचा प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. तो यंदाही मिळेल, या अपेक्षेने शेतकरी बाजारात कापूस आणत नसल्याचे चित्र आहे. सध्या आठ ते साडेआठ व साडेआठ ते नऊ हजारांचा दर कापसाला मिळत आहे. मागील कापसाला मिळालेला दर यंदाही मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे. जेव्हा चांगला दर मिळेल, तेव्हा विकू, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे.

दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या गाठींना मागणी कमी झाली आहे. हव्या त्या प्रमाणात मागणी नाही. सोबतच कापसाचे मोठे उत्पादन यंदा झाले आहे. यामुळे व्यापारी कापसाचा दर्जा पाहून आठ ते नऊ हजारांचा दर देत आहे. असे असले तरी कापूस उत्पादकांना अपेक्षित दर मिळत नसल्याने ते बाजारात कापूस आणत नाही. जो आणताहेत तो अतिशय कमी आहे. कापसाअभावी जिनिंग मिल्स सुरू राहू शकत नाहीत. ज्या सुरू आहेत त्या एका पाळीत सुरू आहेत. एखाद्या जिनमध्ये चारशे गाठी तयार होत असतील, तर त्यांना केवळ दोनशे गाठींचाच कापूस उपलब्ध होत आहे. दोनशे गाठी असूनही तयार करता येत नाही. अशीच स्थिती सर्व कारखान्यांची आहे.

हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

रोजगारासाठी काही जिनिंग सुरू

कापूस नसल्याने ५० टक्के चालकांनी जिनिंग बंद केल्या आहेत. ज्या सुरू आहेत त्या कमी क्षमतेने. असे असले तरी व्यापाऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे व्याज, वीजबिल, कर्मचाऱ्यांचा पगार आदी बाबींचा खर्च रोजचा सुरू आहे. ज्या गाठी तयार होताहेत त्यांनाही विकत घेणारे कोणी पाहिजे. त्याला हवी तशी किंमत मिळाली पाहिजे. ते घेणारे नसतील, चांगला भाव मिळत नसेल तर गाठी का तयार करायचा, असा प्रश्‍न जिनिंगचालकांसमोर ‘आ’ वासून उभा आहे. मात्र, कामगारांना रोजगार मिळाला पाहिजे, या अपेक्षेने काहींनी जिनिंग सुरू ठेवल्या आहेत.

"बाजारात कापूसच येत नसल्याचे चित्र आहे. दोन लाख गाठींचा कापूस रोज हवा. मात्र, २५ ते ३० हजार गाठींचा कापूस मिळतोय. ५० टक्के उद्योग कापसाअभावी बंद आहे. कापसाशी संबंधित उद्योग काहीअंशी संकटात आहेत. मात्र, ही परिस्थिती अधिक काळ राहणार नाही."

-प्रदीप जैन, अध्यक्ष, खानदेश जिनिंग प्रेसिंग असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: ‘कर्जमाफी अन् सातबारा कोरा होईपर्यंत स्वस्थ बसू देणार नाही’; पंढरपुरात सुप्रिया सुळे आक्रमक, तुरुंगात जावे लागले तरी चालेल

'अंबा येडू दोघी बहिणी…’ ऐश्वर्या नारकरांसोबत लेकीचाही ठसकेबाज डान्स! VIDEO VIRAL

Asian Games, IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कशी असू शकते Playing XI? कुठे पाहाणार उपांत्यपूर्व सामना?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

सरकारने माझ्या मागण्या मान्य केल्या, ३० दिवसांचा रिचार्ज, डेटाशिवाय प्लान मिळणार; राघव चड्ढांची पोस्ट

SCROLL FOR NEXT