Grains Centre Start
Grains Centre Start esakal
जळगाव

Jalgaon News : जिल्ह्यात केवळ तीन भरडधान्य खरेदी केंद्र सुरू

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात राष्ट्रीय सुरक्षा अन्नधान्य अंतर्गत जिल्हास्तरावरून भरड धान्याच्या खरेदीसाठी जिल्ह्यात १८ केंद्रांना मान्यता दिली आहे.

त्यानुसार जिल्ह्यातील भरड धान्य खरेदी योजनेंतर्गत आतापर्यंत सुमारे दोन हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाईनव्दारा भरडधान्य खरेदीसाठी नोंदणी केली आहे. आतापर्यंत ३ हजार ८९६ क्विंटल भरडधान्याची तीन केंद्रांवर खरेदी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात खरीप हंगाम २०२२-२३ अंतर्गत भरड धान्य खरेदीसाठी ऑक्टोबरअखेर नोंदणीस सुरवात झाली. त्यानुसार १८०० शेतकऱ्यांनी ज्वारी, मका २४७, बाजरीसाठी ६, असे एकूण २०४७ शेतकऱ्यांनी जिल्हाभरात तालुका स्तरावर असलेल्या केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी केली होती. (Only three bulk grain procurement centers are open in district Purchase of 3896 quintals of grain Jalgaon News)

आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

राज्य शासनाच्या सूचनेनुसार भरड धान्य खरेदी केंद्रांना वेळोवेळी मुदतवाढ दिली होती. २१ डिसेंबर २०२२ नुसार शेवटची मुदतवाढ ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत होती. त्यानुसार जिल्ह्यातील तीन केंद्रांवर भरड धान्य खरेदी सुरू झाली.

आतापर्यंत ३ हजार ८९६ क्विंटल भरड धान्याची खरेदी करण्यात आली. जिल्हा प्रशासन स्तरावरून जसजसे गुदाम उपलब्ध करून दिले जातील, तसतसे भरड धान्य खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात येतील.

शासन स्तरावरून ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीनुसार भरड धान्य खरेदी केंद्रावरून धान्य खरेदीसाठी नोंदविलेल्या मोबाईलवर संदेश देण्यात येईल. त्यानुसार शेतकऱ्यांनी नमूद केलेल्या दिवशी खरेदी केंद्रावर भरड धान्य आणावे.

सोबत नोंदणी करतेवेळी दिलेल्या कागदपत्रांच्या झेराक्स प्रती सोबत आणाव्यात, जेणेकरून शासनाकडून खरेदी करण्यात आलेल्या धान्याचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारा वर्ग करणे सोयीचे होईल, असे आवाहन जिल्हा विपणन अधिकारी गजानन मगरे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT