Employment esakal
जळगाव

जळगाव जिल्ह्यात सव्वादोन लाखांवर बेरोजगार

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात यंदा तब्बल २ लाख १९ हजार ५६२ बेरोजगारांनी रोजगार, स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण मिळावे यासाठी अर्ज केले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात यंदा तब्बल २ लाख १९ हजार ५६२ बेरोजगारांनी रोजगार, स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण मिळावे यासाठी अर्ज केले आहेत. त्यातील ९९१ जणांना आरोग्य क्षेत्रातील रोजगारावर आधारित प्रशिक्षण देण्यात आले. दोन जणांना रोजगार मिळाला असून इतरांनी स्वयंरोजगार सुरू केला आहे.

अनेकांनी मिळविला स्वयं रोजगार

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे दरवर्षी रोजगाराबाबत मार्गदर्शन, प्रशिक्षण दिले जाते. कोविड काळात सर्वच बाबींवर निर्बंध असल्याने प्रशिक्षण शक्य नव्हते. कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची कमतरता अधिक भासली. यामुळे यंदा कोरोना (वैद्यकीय) संबंधित प्रशिक्षण देण्यात येत आहे. मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेअंतर्गत ६९१ जणांना नर्सिंग, जनरल ड्यूटी असिस्टंट बेसिक, ॲडव्हान्स, ड्रेसर, फेलोरोटोमिस्ट (लॅब सहाय्यक) आदी संवर्गातील प्रशिक्षण जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात देण्यात आले. यातील ४६६ प्रशिक्षणार्थी परिक्षेस पात्र झाले. तीस जण परिक्षा उत्तीर्ण झाले. कोरोना महामारीत ऑक्सिजन प्लांट प्रत्येक शासकीय रुग्णालयात उभारण्यात आले. त्यावर देखरेख ठेवणे, प्लांट सूरू करणे, बंद करणे, त्यांचे मेंटेनस ठेवणे याबाबतचे प्रशिक्षण तीस प्रशिक्षणार्थींना देण्यात आले. तर कस्टमाईस क्रॅश कोर्स (सीसीसीपी) अंतर्गत २७० जणांना प्रशिक्षण दिले. कोरोना काळात ज्या पदांच्या गरज भासली त्या पदांची प्रशिक्षणे या उपक्रमात देण्यात आली. यातून अनेकांनी स्वयं रोजगार मिळविला आहे.

''बेरोजगारांना स्वयंरोजगार अथवा रोजगार (नोकरी) देण्यासाठी विविध क्षेत्रात प्रशिक्षणाची गरज असते. ते आम्ही देतो. यातून बेरोजगारांना प्रॅक्टिकल ज्ञान मिळवून तो रोजगार, स्वयंरोजगार मिळवू शकतो. बेरोजगार युवकांनी आमच्या विभागातील प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.'' - विश्‍वनाथ मुकणे, सहाय्यक आयुक्त - कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT