Pachora Congress distributed carrots in protest against the state government showing carrots to people through budget jalgaon news esakal
जळगाव

Budget 2023 : पाचोरा काँग्रेस पक्षाकडूनगाजर वाटून अर्थसंकल्पाचा निषेध

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा (जि. जळगाव) : अर्थसंकल्पातून राज्य सरकारने जनतेला गाजर दाखविल्याच्या निषेधार्थ पाचोरा कॉंग्रेसने गाजर वाटून निषेध आंदोलन केले. (Pachora Congress distributed carrots in protest against the state government showing carrots to people through budget jalgaon news)

राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना केवळ गाजर दाखवण्यात आले असून, या अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ पाचोरा येथे काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली गाजर वाटून अर्थसंकल्पाचा निषेध करण्यात आला.

शेतकरी, महिला, लघुउद्योग यांच्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही ठोस घोषणा राज्य सरकारने केली नसूनअर्थसंकल्पातून जनतेला केवळ गाजर दाखवले आहे. कापूस हा महत्वपूर्ण विषय असतांना अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली नाही.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल असा कोणताही ठोस निर्णय घेतला नसुन सामान्य माणसाला गाजर देण्यात आले असल्याचे स्पष्ट करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अर्थसंकल्पाचा निषेध केला.

यावेळी सचिन सोमवंशी, अॅड अमजद पठाण, प्रताप पाटील, इरफान मनियार, शरीफ शेख, राहुल शिंदे, कल्पेश येवले, श्रावण गायकवाड, अमजद मौलाना, शंकर सोनवणे, परवेज खान, रहीम शेख, शाहरुख खान, अमर खान, जुनेद खान, इम्रान देशमुख, जुनेद बागवान, सुनील पाटील, विजय गुजर, राजु गायकवाड, विनोद सुरवाडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देशाच्या राजकारणात मोठा बदल... विरोधकांना कमजोर समजणं NDAला पडलं महागात? दोन-तृतीयांश बहुमताचं स्वप्नाचं काय झालं?

Post Office Scheme: FD पेक्षा भारी ही पोस्टाची स्कीम? फक्त 1,000 रुपयांपासून गुंतवणूक अन् 7.5% व्याजदर? पाहा संपूर्ण गणित

Riddhi Thakkar: लेकीचा मृतदेह आणायला जन्मदात्याचा १००० किमी प्रवास, समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : नाशिक पुन्हा हादरलं! ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maratha Reservation: ‘माझी टिंगल करा, मला वाईट वाटणार नाही’; जरांगेंच्या टीकेला बावनकुळेंचा सडेतोड पलटवार, एकही दाखला रद्द केलेला नाही

SCROLL FOR NEXT