Pachora Agricultural Produce Market Committee  esakal
जळगाव

Pachora Market Committee Election : 59 उमेदवार रिंगणात; 168 उमेदवारांची माघार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : पाचोरा - भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठीच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत १६८ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ५९ उमेदवार रिंगणात आहेत. (Pachora Market Committee Election 168 candidate withdrew now 59 candidates are in election jalgaon news)

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकूण २३४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी तीन अर्ज अवैध ठरल्याने २३१ उमेदवारी अर्ज होते. दरम्यान, आज (ता. २०) उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अंतिम मुदतीत सोसायटी मतदारसंघातील सर्वसाधारण जागेसाठी ७६ उमेदवारांनी माघार घेतल्याने २३ उमेदवार रिंगणात आहेत.

महिला राखीवच्या २ जागांसाठी ८ जणांनी माघार घेतल्याने ६ उमेदवार, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या १ जागेसाठी १६ जणांनी माघार घेतल्याने ३ उमेदवार, इतर मागासवर्ग राखीवसाठी १६ उमेदवारांनी माघार घेतल्याने ४ उमेदवार रिंगणात आहेत.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारणसाठी २७ उमेदवारांनी माघार घेतल्याने ६ उमेदवार रिंगणात आहेत. अनुसूचित जाती जमातीच्या ११ उमेदवारांनी माघार घेतल्याने ३ उमेदवार रिंगणात आहेत.

आर्थिक दुर्बल घटकाच्या ७ उमेदवारांनी माघार घेतल्याने ३ उमेदवार रिंगणात आहेत. व्यापारी मतदार संघाच्या २ जागांसाठी ११ उमेदवारांनी माघार घेतल्याने ८ उमेदवार रिंगणात असून हमाल मापाडीच्या १जागेसाठी १ उमेदवाराने माघार घेतल्याने ३ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण १६८ उमेदवारांनी माघार घेतली असून, ५९ उमेदवार आता रिंगणात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना अटक

Explained: दूध प्यायल्याने लठ्ठपणा वाढतो का? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT