Pachora: While discussing with DRM Kedia regarding various facilities at railway station, Khalil Deshmukh, Adv. Avinash Bhalerao, Sunil Shinde, Ganesh Patil, V. T. Joshi, Nandkumar Sonar, Pappu Rajput etc.
Pachora: While discussing with DRM Kedia regarding various facilities at railway station, Khalil Deshmukh, Adv. Avinash Bhalerao, Sunil Shinde, Ganesh Patil, V. T. Joshi, Nandkumar Sonar, Pappu Rajput etc. esakal
जळगाव

Jalgaon News | पाचोरा रेल्वेस्थानक होणार ‘स्मार्ट’ : डीआरएम केडिया

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा : येथील मध्य रेल्वेचे स्थानक लिफ्टसह विविध अत्यावश्यक सुविधा देऊन ‘स्मार्ट स्थानक’ करणार असल्याचे डीआरएम एस. एस. केडिया यांनी रेल्वे कृती समिती व शिष्टमंडळाच्या चर्चेप्रसंगी आश्‍वस्त केले.

डीआरएम केडिया यांनी शुक्रवारी (ता. १३) दुपारी पाचोरा स्थानकास भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी रेल्वे कृती समितीच्या पदाधिकारी व सदस्यांना केडिया यांनी भेटीसाठी आमंत्रित केले होते. कारण कृती समितीचे प्रयत्न व पाठपुराव्यामुळे पीजे रेल्वेचा प्रश्न मार्गी लागला असून, पीजे नॅरोगेज रेल्वेचे ब्रॉडगेज व मलकापूरपर्यंत विस्तारीकरण कामाची प्रक्रिया सुरू झाली आहे. (Pachora railway station will be a smart station assurance of DRM Media Discussion of delegation Jalgaon News)

पाचोरा रेल्वेस्थानक होणार ‘स्मार्ट’रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष खलिल,देशमुख ॲड. अविनाश भालेराव, सुनील शिंदे, गणेश पाटील, भरत खंडेलवाल, उमवि सिनेट सदस्य व्ही. टी. जोशी, पप्पू राजपूत, संजय जडे, शहाबाज बागवान, नंदकुमार सोनार, प्रा. मनीष बाविस्कर, प्रताप पाटील, शशिकांत मोरे, नीलेश कोटेचा यांनी श्री. केडिया यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. पाचोरा रेल्वेस्थानकावरील भेडसावणाऱ्या समस्या, आवश्यक त्या सुविधा, निकामी ठरत असलेला जिना, नव्याने तयार करण्यात आलेल्या प्लॅटफॉर्मवर शेड एक्स्प्रेस तसेच गाड्यांना थांबा या संदर्भात चर्चा झाली. पाचोरा स्थानकावरून सायंकाळी सातनंतर मुंबईला जाण्यासाठी कोणतीही गाडी नसल्याने पाचोरा, भडगाव, जामनेर, सोयगाव, एरंडोल येथील प्रवाशांना प्रचंड त्रास, मनस्ताप व आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो म्हणून पंजाब व विदर्भ एक्स्प्रेसला पाचोरा स्थानकावर थांबा देण्यात यावा.

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

भुसावळ ते मुंबई पॅसेंजर पूर्ववत करण्यात यावी, इगतपुरी ते भुसावळ या गाडीची वेळ पूर्वीप्रमाणे सकाळी साडेआठला करून विद्यार्थी व अपडाऊन करणाऱ्यांना होणारा त्रास थांबवावा. प्लॅटफॉर्मवर सुविधा मिळाव्यात, अशा मागण्यांबाबत चर्चा होऊन मागण्यांचे निवेदन केडिया यांना देण्यात आले.

त्या आधारे श्री. केडिया यांनी रेल्वेस्थानकावर चार लिफ्ट, कोच इंडिकेटर, प्लॅटफॉर्मवर शेड तसेच प्लॅटफॉर्म लांबविण्यात आल्याने गाडी जिन्यापासून बऱ्याच लांब अंतरावर थांबत असल्याने प्रवाशांना जिन्यापर्यंत येण्यासाठी हाल सोसावे लागतात म्हणून गाडी जिन्याजवळ थांबेल, अशा पद्धतीने थांबवावी अशा मागण्या करण्यात आल्या. त्या संदर्भात केडिया यांनी सकारात्मकता दर्शवून स्थानकावर सुविधा देण्याचे आश्वस्त केले.

केडियांकडून पीजे रेल्वे रुळांची पाहणी

पीजे रेल्वे ब्रॉडगेज व विस्तारीकरणाची प्रक्रिया सुरू झाली असून, भूसंपादनासाठी रेल्वे मार्गालगतच्या शेतकऱ्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. श्री. केडिया यांनी पाचोरा, वरखेडी, शेंदुर्णी, पहूर, पिंपळगाव, भागदरा, जामनेर येथील पीजे रेल्वेस्थानक व रुळांची पाहणी केली. याप्रसंगी रेल्वेचे अभियंता पंकज धावरे, डॉ. शिवराज मानसपुरे, तरुण ददोरिया, निकाशी थोडमाल, निखिल सिंग, आलोक शर्मा आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : ममता बॅनर्जी यांचा जाहीर सभेत कलाकारांसोबत डान्स

Electric Scooters Battery: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी खराब झाल्यास मिळतात 'हे' संकेत, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT