panel by Maha Vikas Aghadi in market committee elections Jalgaon news esakal
जळगाव

Market Committe Election : जळगाव बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचे पॅनल

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे (Maha Vikas Aghadi) पॅनल उभे करण्याचा निर्णय माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. (panel by Maha Vikas Aghadi in market committee elections Jalgaon news)

जळगाव बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसशिवसेना महाविकास आघाडीच्या तालुक्यातील नेत्यांची प्राथमिक स्वरूपाची बैठक बुधवारी (ता. २२) माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या अध्यक्षतेखाली मजूर फेडरेशनच्या कार्यालयात झाली.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

यानंतर महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांची विस्तृत बैठक घेण्यात येईल व त्यात पॅनल निश्चित करण्यात येईल, असे सर्वानुमते ठरविण्यात आले. बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना ठाकरे गटाचे मनपातील विरोधी पक्षनेते सुनील महाजन, जिल्हा बँकेचे संचालक श्यामकांत सोनवणे, लक्ष्मण पाटील (लकी टेलर), राष्ट्रवादी सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, युवा सेनाप्रमुख नीलेश चौधरी, काँग्रेसचे बेनहर टेलर, माजी नगरसेवक मनोज चौधरी, लीलाधर तायडे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

Sugar Export Ban: निर्यात बंदीमुळे देशातील साखर उद्योगासमोर संकट: हर्षवर्धन पाटील यांची माहिती; आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम होणार!

SCROLL FOR NEXT