While congratulating the 'team' of Government Medical College and Hospital of Jalgaon, who participated in the research of ICMR-NIE, the founder Dr. Girish Thakur. esakal
जळगाव

Jalgaon News : राष्ट्रीय संशोधनात जळगाव ‘GMC’चा सहभाग; अचानक होणाऱ्या मृत्युंविषयी केले संशोधन

कोरोना पार्श्‍वभूमीवर अचानक होणाऱ्या मृत्युंविषयी आयसीएमआर-एनआयई यांनी देशात संशोधन केले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : कोरोना पार्श्‍वभूमीवर अचानक होणाऱ्या मृत्युंविषयी आयसीएमआर-एनआयई यांनी देशात संशोधन केले. त्यात महाराष्ट्रातून एकमेव जळगावच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (जीएमसी) सहभाग घेतला.

अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी ‘टीम’चे कौतुक करीत सत्कार केला. (Participation of Jalgaon GMC in National Research jalgaon news)

आयसीएमआर-एनआयई यांनी देशातील ४७ विविध रुग्णालयात मे ते ऑगस्ट २०२३ मध्ये ‘केस कंट्रोल स्टडी’ केला होता. त्यात महाराष्ट्रातून जळगावमधील एकमेव सरकारी रुग्णालयाचा समावेश होता. कोरोना-१९ आजाराला प्रतिबंध लस घेतल्याने अचानक मृत्यू होतात काय? हे शोधण्यासाठी हा अभ्यास होता.

अचानक मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबात यापूर्वी अचानक मृत्यू होण्याचा इतिहास होता, काहींना अतिमद्यप्राशन व अतिव्यायाम या कारणांमुळे मृत्यू झाला असा निष्कर्ष या अभ्यासातून निघाला आहे. मात्र, कोरोनाची एक लस घेतलेल्या व्यक्तींमध्ये हे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे.

अभ्यास आंतरराष्ट्रीय जर्नल ‘इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च’ यात प्रकाशित झाला आहे. जळगाव ‘जीएमसी’च्या ‘टीम’ने पंधरा मृत्यूंच्या प्रकरणांचा अभ्यास केला. त्यांच्या आजूबाजूला राहणारे एकूण साठ व्यक्तींचा अभ्यास केला. त्यातून निष्कर्ष नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाला आहे.

जळगाव ‘जीएमसी’च्या ‘टीम’मध्ये मुख्य संशोधक म्हणून जनऔषधवैद्यक शास्त्र विभागप्रमुख डॉ. योगिता बावस्कर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, न्यायवैद्यकशास्त्र प्रमुख डॉ. रमेश वासनिक, डॉ. गणेश लोखंडे, डॉ. आस्था गणेरीवाल यांचा समावेश होता. त्यांना विविध तालुक्यात जाऊन माहिती संकलित करण्यासाठी डॉ. डॅनिअल साजी, डॉ. सुनयना कुमठेकर, डॉ. दीपक वाणी यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT