Maharashtra Covid Updates sakal
जळगाव

ना कुठे प्रतिबंधित क्षेत्र.. ना कसले विलगीकरण! आता निर्बंधांची मानसिकताच नाही

नव्या असलेल्या संकल्पना आता कोरोनाचे अस्तित्व कायम असले आणि रुग्ण वाढत असले तरी बाद झाल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कोरोनाच्या (Corona) पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने (Second wave) मोठी जीवितहानी झाली... दोन वर्षांपूर्वीचे प्रतिबंधित क्षेत्र, घरदार सोडून होत असलेले विलगीकरण या त्यावेळी नव्या असलेल्या संकल्पना आता कोरोनाचे अस्तित्व कायम असले आणि रुग्ण वाढत असले तरी बाद झाल्या आहेत. प्रशासन त्याबाबत उदासीन तर आहेच, शिवाय नागरिकांचीही आता निर्बंध पाळण्याची मानसिकता नाही. (People not follow covid protocol)

मार्च २०२०पासून भारतात कोरोनाचा काळ सुरु झाला. बघता- बघता या महामारीने देश व्यापला. महाराष्ट्राने कोरोना बाधित, मृत्यूच्या आकड्यांत देशात अव्वल क्रमांक गाठला. जळगाव शहरासह जिल्हा हॉटस्पॉट ठरला. (latest corona updates)


पहिल्या लाटेत भीती
कोरोनाची पहिली लाट एप्रिल ते सप्टेंबर २०२० अशी सहा महिने राहिली. या टप्प्यात उपचाराची पद्धती माहित नव्हती. लॉकडाऊन, बाधित रुग्णाचे घर व एक किलोमीटर परिघातील क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र, रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांचे विलगीकरण अशा एक ना अनेक नव्या संकल्पना समोर आल्या. अनेकांचे जीव गेल्यानंतर लाट ओसरली.


प्रतिबंधित क्षेत्र बाद
कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारी २०२१ ते जून २०२१ या चार महिन्यांच्या काळात आली. या लाटेने देशभरातील आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा उघड केल्या. या काळात प्रतिबंधित क्षेत्र वगैरे ही संकल्पनाच बाद झाली, कारण घराघरांत रुग्ण आढळून येत होते.



तिसरी लाट थोपविली
दुसऱ्या लाटेतील अनुभवाने आरोग्य यंत्रणा शहाणी झाली. आरोग्यासंबंधी पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात आला. त्यातच देशी-विदेशी लसी आल्याने व नियोजनबद्धपणे लसीकरण अभियान राबविण्यात आल्यामुळे तिसरी लाट थोपविली गेली. मात्र, या लाटेत रुग्णवाढ होत असताना प्रतिबंधित क्षेत्र ही संकल्पना पूर्णपणे बाद झाली.


आता तर विलगीकरणही नाही
आता गेल्या महिनाभरापासून देशभरात रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यातही रुग्ण वाढू लागले असून जळगाव जिल्ह्यातही काही प्रमाणात रुग्णांची संख्या वाढतच आहे. मात्र, या रुग्णवाढीने का कुठे भीती आहे ना तणाव. उलटपक्षी आता सर्वच निर्बंधमुक्त झाल्यामुळे गेल्या दोन वर्षांतील निर्बंधाच्या अनुभवात पोळलेले नागरिक निर्बंध पाळण्याच्या मानसिकतेत नाहीत. अगदी विलगीकरण संकल्पनाही राहिलेली नाही. ज्या घरात रुग्ण आढळला त्या घरातही तो स्वत: विलगीकरणात राहत नाही. कारण या रुग्णवाढीत लक्षणे नसलेल्यांचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

''कोरोनाच्या सुरवातीच्या टप्प्यात सर्वच नवीन होते, उपचारही उपलब्ध नव्हते. आता तशी स्थिती नाही. लसीकरण झाले असून, नैसर्गिक प्रतिकारशक्तीही परिणामकारक ठरत आहे. रुग्ण आढळून येत असले तरी ते तीन-चार दिवसांतच बरे होत आहेत.'' - डॉ. जयप्रकाश रामानंद
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT