accident news. esakal
जळगाव

Jalgaon News : भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत भडगावला एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

भडगाव (जि. जळगाव) : शहरातील एका व्यक्तीस भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली. यात एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे. वाहनचालकाविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. (person hit by speeding tractor killed in incident jalgaon crime news)

भडगाव शहरातील गंजीवाडा भागातील मशिदीजवळ शफियोद्दिन कमरोद्दिन शेख (वय ५०, रा. गंजीवाडा, भडगाव) यांना भरधाव ट्रॅक्ट्ररने (एपी २५, एआर ४७०४) पुढील उजव्या चाकाने समोरून जोरात धडक मारली.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

या अपघातात शफियोद्दिन कमरोद्दिन शेख यांचा मृत्यू झाला. दरम्यान, चालक घटनास्थळावरून पसार झाला. मृताचा भाऊ शेख बशीर शेख कमरोद्दीन, (रा. गंजी मोहल्ला, भडगाव) यांच्या तक्रारीवरून भडगाव पोलिस ठाण्यात ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT