Vitthal's small chariot made by children  esakal
जळगाव

Pimprala Rathotsav : सुखालाही आला आनंदाचा पूर... चालला नामाचा गजर! भक्तांच्या उत्साहाला उधाण

सकाळ वृत्तसेवा

Pimprala Rathotsav : सुखालाही आला या हो

आनंदाचा पूर...

चालला नामाचा गजर

अवघे गरजे पंढरपूर...

आषाढी एकादशीला पंढरपूरनगरीत लाखो भक्त पांडुरंगाच्या भक्तीत लीन होत असताना, जळगावातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंप्राळा उपनगरातही गुरुवारी (ता. २९) रथोत्सवानिमित्त भक्तांच्या आनंदाला पूर आला होता. (pimprala rathotsav celebrated jalgaon news)

दुपारी बाराला निघालेला रथ सायंकाळपर्यंत भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडत पूर्ववत मंदिराजवळ येऊन आपल्या घरात विराजमान झाला.

‘जानकाबाई की जय, पांडुरंग हरी वासुदेव हरी’च्या नामघोषाने परिसर दुमदुमला होता. गेल्या दोन दिवसांपासून तुरळक स्वरूपात का असेना पावसाला सुरवात झाली. गुरुवारीही पावसाने हजेरी लावल्याने भाविकांमध्ये उत्साह संचारला होता. पावसाने ओढ दिली, तरी आषाढीला पाऊस रथ ओला करतोच, अशी भक्तांची श्रद्धा आहे. रिमझिम पावसाने ती श्रद्धा खरी ठरवली.

पहाटेपासूनच कार्यक्रम, विधी

पिंप्राळा उपनगरातील श्री विठ्ठल मंदिर संस्थान, वाणी पंच मंडळ व ग्रामस्थ मंडळी यांच्या सहकार्याने आषाढी एकादशीनिमित्त गुरुवारी रथोत्सवात भक्तीचा मेळा रंगला होता. रथाला पानाफुलांनी सजवून, आकर्षक दिव्यांची रोषणाई करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रथाच्या चाकाची पूजा करताना भाविक

रथोत्सव पाहण्यासाठी खानदेशातील विठ्ठलभक्त आले होते. गुरुवारी श्री विठ्ठल मंदिरात पहाटे पाचला विठ्ठल-रुक्मिणी मूतींचा महाअभिषेक व पूजन झाले. सकाळी सातला वाणी समाजातर्फे विलास व मोनाली वाणी, पंकज व जागृती वाणी, भगवान वाणी यांच्या हस्ते अभिषेक झाला.

मान्यवरांच्या हस्ते पूजन

सकाळी साडेअकराला मंदिराचे पुजारी श्याम जोशी यांच्या मंत्रोच्चारात वाणी समाजातर्फे मयूर वाणी यांच्या हस्ते रथाची महापूजा झाली. त्यानंतर माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख, महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड,

भाजपचे रोहित निकम, जळगाव पीपल्स बँकेचे अध्यक्ष अनिकेत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते रथाची महाआरती झाली. माजी पोलिसपाटील विष्णू पाटील, सामाजिक कार्यकर्ते अतुल बारी, परशुराम सोमाणी, नगरसेवक विजय पाटील, नगरसेवक मयूर कापसे, माजी नगरसेवक चंद्रकांत कापसे, श्री विठ्ठल मंदिर संस्थानचे अध्यक्ष मोहनदास वाणी, रथोत्सव समितीप्रमुख अनिल वाणी, राकेश वाणी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

रथाला मोगरी लावताना
रथासमोर नाचताना भवान्या (छायाचित्रे : संधिपाल वानखेडे)

भक्तिमय वातावरण

बारीवाडा भागातील रथ चौकातून महाआरतीनंतर ‘जानकाबाई की जय’ व ‘पांडुरंग हरी वासुदेव हरी’च्या नामघोषात माजी मंत्री जैन, आमदार भोळे आदींसह भक्तगणांनी दोराने रथ ओढण्याचा आनंद लुटला. रथापुढे पालखी, भजनी मंडळ, दिंडी, भगवे झेंडे, गुरव मंगल वाद्य, लेझीम, भवानी देवीची सोंगे भाविकांचे आकर्षण ठरले.

श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांची अलोट गर्दी, रथोत्सव मार्गावर आयोजक व भाविकांच्या स्वागतासाठी फराळ, चहापाणी व पिण्याचे पाण्याची मोफत सेवा करण्यात आली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रथ सोमाणी व्यापारी संकुलाजवळील मुख्य चौकात आला. तेथे विठ्ठलभक्तांचा मेळा जमला होता.

...तेव्हापासून पिंप्राळ्यात रथोत्सव

पिंप्राळ्यात (कै.) तोताराम नथ्थूशेठ वाणी यांची एकुलती कन्या जानकाबाईचे तरुण वयात निधन झाले. आपल्या मुलीच्या स्मरणार्थ त्यांनी श्री पांडुरंगाचा एक सुंदर लाकडी कोरीव काम केलेला रथ श्री विठ्ठल मंदिरास अर्पण केला. तेव्हापासून ‘जानकाबाई की जय’च्या जयघोषाने पिंप्राळानगरीत आषाढी एकादशीला रथ काढण्याची परंपरा सुमारे १४८ वर्षांपासून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT