Plan approved in Handya Kundya Irrigation Project Affected Sanctuary Area jalgaon news 
जळगाव

Jalgaon News: हंड्या-कुंड्या पाटबंधारे प्रकल्प बाधित अभयारण्य क्षेत्रात योजना; वन्यजीव व्यवस्थापनला मान्यता

यावल अभयारण्याच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्र संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : हंड्या -कुंड्या लघू पाटबंधारे प्रकल्पामुळे (देव्हारी ता.चोपडा) यावल अभयारण्यातील बाधित होणाऱ्या वनक्षेत्रासाठी वन्यजीव व्यवस्थापन योजना मंजूर करण्यात आली आहे.

त्यामुळे वन्यजीवांना अधिवासास कोणताही अडथळा येणार नाही. या योजनेसाठी लघू पाटबंधारे विभागाने वन विभागाला एक कोटी ३८ लाख ७२ हजार रुपये द्यावेत, असा निर्णय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली समितीने बुधवारी (ता. २७) घेतला.

यावल अभयारण्याच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्र संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. (Plan approved in Handya Kundya Irrigation Project Affected SanctuaryArea jalgaon news)

यावलचे उपवनसंरक्षक जमीर एम. शेख, लघू पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंता आ. नि. सूर्यवंशी, वन्यजीव संरक्षण संस्थेच्या जैव विविधताचे सदस्य लक्ष्मीनारायण सोनवणे, सातपुडा बचाव कृती समितीचे निमंत्रक राजेंद्र नन्नवरे, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी करणसिंग राजपूत,‌ लघू पाटबंधारे विभागाचे सल्लागार‌ उज्वल पाटील आदी उपस्थित होते.

हंड्या-कुंड्याच्या साठवण तलावासाठी ३१.४९ हेक्टर क्षेत्राचा प्रस्ताव सादर केला आहे. प्रकल्पात बाधित होणाऱ्या वन जमिनीसाठी वनसंवर्धन (अधिनियम) १९८० अंतर्गत केंद्र सरकारची तत्वत: मंजुरी मिळाली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रकल्प भागातील वन्यजीवांना अधिवासास योग्य असे पर्यावरणीय वातावरण राहावे यासाठी वन्यजीव व्यवस्थापन योजना तयार करण्याचा निर्णय घेतला. योजनेसाठी येणारा खर्च लघू पाटबंधारे विभागाकडून वसूल करण्यात यावा.

त्यानुसार लघु पाटबंधारे विभागाने प्रकल्पासाठीचा निधी वन विभागाकडे हस्तांतरित करावे, असे समितीने निर्णय घेतला. श्री. शेख हे समितीचे सचिव असून त्यांनी आराखडा या विषयातील तज्ज्ञांच्या साहाय्याने बनविला आहे. त्यामुळे सातपुडा पर्वतरांगांमधील वन्यजीव अधिवास विकास आणि त्यांचे संरक्षणाचे कामे व्यवस्थित पार पाडण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT