PM kisan Nidhi Yojna esakal
जळगाव

Jalgaon News : PM किसान निधीसाठी E- KYC प्रमाणीकरण बंधनकारक

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे आधार क्रमांकास जोडलेल्या बँक खात्यात जमा होणार आहेत. बँक खाते आधारशी संलग्न नसेल, अशा लाभार्थ्यांनी त्यांच्या बँक खाती आधार संलग्न करणे बंधनकारक आहे, असे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सांगितले.

लाभार्थ्यांनी संबंधित बँकेत जाऊन स्वत:चे बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रमाणीकरण करणे बंधनकारक करण्यात आले असून, त्याशिवाय लाभार्थ्याला शासनाकडून या योजनेचा पुढील हप्ता वितरित होणार नाही. (PM Kisan Yojana Fund E KYC authentication mandatory Jalgaon News)

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

अद्यापही ई-केवायसी प्रमाणीकरण न केलेल्या लाभार्थ्यांना पीएम किसान पोर्टलच्या https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावर फार्मर कार्नरमधील ई-केवायसी या टॅबमधून ओटीपीद्वारे स्वतः ई-केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल.

तसेच ग्राहक सेवा केंद्रावरून (सीएससी) बायोमॅट्रिक पद्धतीने ई-केवायसी प्रमाणीकरण करता येईल. त्यासाठी केंद्र शासनाने प्रतिलाभार्थी प्रमाणीकरण शुल्क दर १५ रुपये निश्चित केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Wage Limit Hike : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ईपीएफओची वेतन मर्यादा वाढली; ५१ लाखांहून अधिक जणांना फायदा

Satara Crime : साताऱ्यात दोन गटात हाणामारी, तणावाचे वातावरण; शेवटी २ मंडळांचे केले गणेश विसर्जन, १४ जणांवर गुन्हा दाखल

Team India Update: वरुण चक्रवर्तीच्या जागी आशियाई स्पर्धेसाठी DC चा ऑल राऊंडर; IND vs WI मालिकेत हार्दिक पांड्याचे खेळणे अवघड

मुंबई-नाशिक हायवेवर अपघात, एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू, देवदर्शनाहून परतताना २ वर्षांपूर्वी जळालेल्या ट्रकला गाडीची धडक

Marathi News Live Updates : यमुना नदी आणि इतर जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनास मनाई

SCROLL FOR NEXT