NMU Jalgaon News esakal
जळगाव

Jalgaon NMU Festival : ‘उमवि’ मराठी विभागात रंगले कविसंमेलन

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा होत असून, त्याचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांचे कविसंमेलन घेण्यात आले. मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. म. सु. पगारे अध्यक्षस्थानी होते.

कविसंमेलनात प्रशाळेतील काही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यात विद्यार्थी आकाश कांगळे याने ‘खेळ हा माझा’, मयूरी सोनवणे हिने ‘आत्मभान’, महेश सूर्यवंशी याने ‘सत्यशोधक’, सचिन माळी यांनी ‘जीवनसाथी’ आणि नारायण पुरी यांची ‘प्रेमाची जांगड-गुत्ता’, तर धवल सूर्यवंशी यांनी भारत देशावर या कविता सादर केल्या. (Poet Bahinabai Chaudhari North Maharashtra University Marathi Section Celebrate Kavi Sammelan Jalgaon News)

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

प्रा. कृष्णा संदानशिव यांनी नामदेव ढसाळ यांची ‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो व नर्गिस’ या कवितेचे वाचन केले.

अध्यक्षीय मनोगतात प्रा. म. सु. पगारे यांनी काव्यवाचनाविषयी मार्गदर्शन केले. प्रा. दीपक खरात यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थिनी निशा सपकाळे हिने सूत्रसंचालन करून आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB चा फलंदाज Unstoppable ! १४ चेंडूंत ६४ धावा कुटून संघाला मिळवून दिला दणदणीत विजय; KKR ला होतोय पश्चाताप

Latest Maharashtra News Updates : मराठा आरक्षणावरील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर डबल बेड मॅट्रेस अन् सोफ्यासह दुरुस्तीचा खर्च तब्बल ४० लाख; इतकी उधळपट्टी कशाला? विरोधकांचा सवाल

Gemini Photo Trend : गुगल जेमिनीवर तुम्ही फोटो बनवताय, पण त्या फोटोचे पुढे काय होते? खरंच यामुळे डेटा लिक होतो का..जाणून घ्या सत्य

Maruti car price cut : दसरा, दिवाळीच्या आधी ‘मारूती’चा बडा धमका! कारच्या किंमतींमध्ये मोठी कपात जाहीर

SCROLL FOR NEXT