Police arrested 2 minors suspected of stealing bikes Jalgaon Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : बच्चा गॅंगचा वाहनचोरीचा धंदा; मौज-मजेसाठी चोरी...

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील विविध भागातून दुचाकींची चोरी करणाऱ्या संशयित दोन अल्पवयीन मुलांना शहर पोलिसांनी एसएमआयटी कॉलेज परिसरातून अटक केली आहे.

त्यांच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, मौज-मजा करण्यासाठी चोरट्यांनी गुन्हेगारीचा मार्ग पत्करला असून, पोलिस उपअधीक्षकांनी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनात दोघांना ताब्यात घेतले. (Police arrested 2 minors suspected of stealing bikes Jalgaon Crime News )

जळगाव शहरासह उपविभागातील दुचाकींची चोरीचे प्रकार वाढत आहे. या अनुषंगाने पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप गावित, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार, सहाय्यक फौजदार बशीर तडवी, पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय निकुंभ, उमेश भांडारकर, भास्कर ठाकरे, प्रफुल्ल धांडे, पोलिस नाईक किशोर निकुंभ, गजानन बडगुजर, योगेश पाटील, राजकुमार चव्हाण, रतन गिते, तेजस मराठे, योगेश इंदाटे, अमोल ठाकूर यांनी शुक्रवार (ता. १४) मध्यरात्री एसएमआयटी कॉलेज परिसरात सापळा रचून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

या दोघांकडून चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत. दरम्यान, त्यांच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक किशोर निकुंभ करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नवीपेठेतून दुचाकीचोर अटकेत

जळगाव तालुक्यातील विटनेर येथील सुनील दिलीप सूर्यवंशी (वय ३०) हा जळगाव शहरातील नवीपेठ परिसरात आला होता. त्याची (एमएच १९, सीपी ९५२२) या क्रमाकांची दुचाकी अनुभूती शाळेजवळ उभी होती.

काम आटोपून सुनील परत आला असता, त्याला त्याची दुचाकी मिळून आली नाही. सुनील सूर्यवंशी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी चंद्रकांत रामदास साळुंखे याला अटक केली आहे. पुढील तपास महिला पोलिस नाईक भारती देशमुख करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Mumbai News: पावसाची पुन्हा विश्रांती पण मुंबईकरांना दिलासा, सातही धरणात ९५ टक्के पाणीसाठा; पाहा आकडेवारी

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

SCROLL FOR NEXT