Akshay Patil, Nikhil Patil, Chetan Patil, Bhatu Patil esakal
जळगाव

Jalgaon News : गो-तस्करीच्या संशयातून ट्रक पेटवणारे अटकेत

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर(जि. जळगाव) : बाजारातील गुरे घेऊन जाणाऱ्या वाहनावर चोरीच्या (Thief) गुरांची वाहतूक करत असल्याचा संशय तसेच त्या वाहनाचा पाठलाग करून चालकास मारहाण करून

चारचाकी मालवाहू वाहन जाळून टाकल्याची घटना १३ फेब्रुवारीला रात्री एकच्या सुमारास चांदणी कुऱ्हा रस्त्यावरील सती माता मंदिराजवळ घडली होती. (police arrested suspect who set fire to truck on suspicion of cow smuggling jalgaon crime news)

या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवून सातपैकी चार संशयिताना ताब्यात घेतले आहे. शिरपूर येथून बाजारातील १० जनावरे घेऊन निघालेले मालवाहू वाहन (एमएच १९, सीवाय ४२९७) गुरे सोडण्यासाठी नेरी (ता.जामनेर) येथे १२ फेब्रुवारीला रात्री अकराच्या सुमारास जात असताना दोन चारचाकी व एक दुचाकीवरील सात जणांनी धरणगावकडे जात असताना १३ फेब्रुवारीला रात्री एकच्या सुमारास अडविले.

या वेळी मारहाण होईल, या धाकाने चालक गाडी सोडून पळण्याचा प्रयत्न करीत असतांना युवकांनी त्यास पाठीवर दगड मारून जखमी केले. चालक गाडी सोडून शेतात लपून राहिला व गाडीत बाजारातून नेरी (ता.जामनेर) येथे पोचविण्यासाठी आणलेले १० जनावरे गाडीतून उतरवून सोडून दिले.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

ताब्यात असलेले चारचाकी मालवाहू वाहनाला आग लावून जाळून टाकण्यात आले. त्यात गाडीचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. संदीप रमेश शिरसाठ यांनी अमळनेर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून २० ते ३० वयोगटातील सात तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचातपास पोलिस नाईक मिलिंद बोरसे यांच्याकडे आहे.

दरम्यान, गो-तस्करीच्या संशयातून घडलेल्या या गुन्ह्यात तत्काळ पोलिसांनी तपासचक्रे फिरवून चार संशयिताना ताब्यात घेतले आहे. यात संशयित अक्षय सुनील पाटील, निखिल चंद्रशेखर पाटील, चेतन रवींद्र पाटील, भटू दिलीप पाटील (रा. शनिपेठ वर्णेश्वर महादेव, अमळनेर) या चौघांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: डोंबिवलीत काँग्रेसला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश, पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंकडून नाराजी उघड

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT