online gamblers esakal
जळगाव

पोलिसांचा ऑनलाइन मटक्याच्या अड्ड्यावर छापा; सापडली अख्खी बँक

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर (जि. जळगाव) : शहरात ऑनलाइन मटकासह (Online matka) इतर जुगार (Gambling) चालवून शासन व नागरिकांची फसवणूक (Cheating) करणाऱ्या १८ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, दोन संशयितांना अटक केली आहे.

अबब...इथे तर सापडली अख्खी बँक

पवन चौकातील बोरसे गल्लीत ऑनलाइन मटका जुगाराचे वेबसाइट बनवून जुगार चालवत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळली. त्यावरून निरीक्षक हिरे, उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील, हवालदार किशोर पाटील, महिला कर्मचारी रेखा ईशी, नम्रता जरे, दीपक माळी, सिद्धांत शिसोदे, रवींद्र पाटील, आशिष गायकवाड, रवींद्र पाटील, अमोल पाटील, नीलेश मोरे, अतुल मोरे यांनी मंगळवारी (ता. ११) सायंकाळी बोरसे गल्लीत हरचंद भिला पाटील यांच्या घरात छापा टाकला असता, एका पत्र्याच्या खोलीत लॅपटॉप, चार मोबाईल, २० डायऱ्यांवर ऑनलाइन जुगाराची वेबसाइट, व्हॉट्सॲप, मेलद्वारे मिलन, कल्याण जुगार व सट्टा जुगाराचे आकडे खेळविताना जयंत पाटील (रा. श्रीकृष्ण मंदिर) व फिरोजखान नसीमखान पठाण (रा. अंदरपुरा, सराफ बाजार) मिळून आले.

तीन लाख सात हजार ६०० रुपयांची रोकड, २५ धनादेश, त्यात १४ चेक कोरे व इतर रकमा लिहिलेले, विविध गावच्या जमिनीचे लाखो रुपयांचे उतारे, बखळ प्लॉटच्या जागांचे उतारे, सौदा पावत्या, नोटा मोजण्याचे मशिन आदी मिळून आले. पोलिसांनी डायरी चेक केली असता, त्यात महाराष्ट्र राज्याबाहेर असलेले बुकी साई सचिन, डी. के. शहादा, प्रल्हाद, सुशील, बंटी, धनंजय, भवानी पटणाराम, मुकेश शेठ, प्रकाश शेठ, मनोज, ॲन्थनी, प्रायव्हेट, नरेश, राजधानी, राजू आणि सोबत त्यांचे मोबाईल क्रमांक आढळून आले. संपूर्ण चौकशीत ऑनलाइन लॉटरी, सट्टा, जुगार चालवून लोकांची फसवणूक करून शासनाचा महसूल बुडवून व लोकांना बेकायदेशीर व्याजाने पैसे देत असल्याचे आढळून आले. पोलिस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्या फिर्यादीवरून फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, मुंबई जुगार कायदा, सावकारी अधिनियम २०१४ च्या कलम १७, १२, ३९ प्रमाणे गुन्हा नोंदविला असून, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे तपास करीत आहेत. जयंत आणि फिरोजखान यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: सासवडमध्ये भाजपाचा डबल धमाका; प्रभाग २ आणि ९ पूर्णपणे भगवे

Nagar Palika Result 2025 : उरणमध्ये अज्ञात व्यक्ती स्ट्राँग रुममध्ये घुसला, नाश्ता देण्याच्या बहाण्याने आला अन्... मतमोजणी केंद्रावर राडा

Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 : भाजपच नंबर एकचा पक्ष राहणार! निकालाआधीच काँग्रेसनं केलं मान्य अन् कारणही सांगितलं..

Kolhapur Election Result : कोल्हापूर जिल्ह्यात मतमोजणीला सुरूवात, कागलमध्ये निकालापूर्वी अभिनंदनाचे बॅनर लावल्याने तणाव; उत्कंठा शिगेला

U19 Asia Cup India Pakistan: कुमारांनाही आशिया कप जिंकण्याची संधी; पाकिस्तानविरुद्ध आज अंतिम सामना, भारताचे पारडे जड

SCROLL FOR NEXT