police superintendent beaten criminals who scaring other jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : पोलिस अधीक्षकांनी उतरविली भाईगिरी; एसपी कार्यालयात झोंबाझोंबी करणाऱ्यांना प्रसाद!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : रामानंदनगर पोलिसांत दाखल गुन्ह्यातील संशयिताला प्रतिबंधात्मक कारवाईसाठी आणले होते.

प्राणघातक हल्ल्यात संशयित ‘भाई’च्या साथीदारांनी या वेळेस पोलिस (Police) अधीक्षक कार्यालयाच्या आवारात गर्दी करून झोंबाझोंबी केल्याचे पोलिस अधीक्षकांच्या नजरेस पडले. (police superintendent beaten criminals who scaring other jalgaon news)

तत्काळ गाडी थांबवून स्वतः चौकशी करत या भामट्यांना दंडूक्याचा प्रसाद देत भाईगिरी उतरविली. त्यानंतर त्यांना कारवाईसाठी जिल्‍हापेठ पोलिसात रवाना केले.

रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल प्राणघातक हल्ल्यातील संशयित सागर पाटील याला अटकेनंतर जामिनावर मुक्तता झाल्यानंतर संबंधीत तपासाधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या सुचनेनुसार प्रतिबंधात्मक कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेत रवाना केले होते.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

संशयिताला रामानंदनगर पोलिसांनी गुन्हे शाखेत आणले. त्याच्या दहा ते पंधरा साथीदारांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात गर्दी केली. सायंकाळी नेमके पोलिस अधीक्षक एम. राजकुमार शासकीय वाहनाने आयपी मेसकडे जात होते. त्यांना गोंधळ दिसला. तत्काळ त्यांनी वाहन थांबवून स्वतः चौकशी सुरू केली.

गर्दी करून गोंधळ घालणारे तरुण अट्टल गुन्हेगाराच्या समर्थनार्थ आल्याचे कळताच पोलिस अधीक्षकांनी स्वतःच हातात दांडा घेत त्या सर्वांना योग्य जागी यथेच्छ प्रसाद दिला. पोलिस अधीक्षक स्वतःच कारवाई करीत असताना, पाहून इतर अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. संशयितांना ताब्यात घेत वरिष्ठाच्या सुचनेनुसार संशयितांना जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात कारवाईसाठी रवाना केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Census: महाराष्ट्रात जनगणना कधी सुरू होणार? हा कार्यक्रम किती काळ चालणार? तारखा आल्या समोर...

Video : स्वानंदी समरच्या प्रेमकथेला सुरुवात ! समरला मिळालं रोमँटिक सरप्राईज; प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

LPG Cylinder: सिलेंडरसाठी वाट पाहणं संपलं! इंडेनचा ‘छोटू’ LPG सिलेंडर बाजारात; किराणा दुकानातही सहज मिळणार

माईक हिसकावला आणि स्टेजवरुन हकललं, प्रसिद्ध कॉमेडीयन सुनील पालचा भर कार्यक्रमात अपमान, Viral Video

Central Railway: मध्य रेल्वेवर गोंधळाची परिस्थिती, रुळावर पडून प्रवाशाचा मृत्यू, लोकल सेवा खोळंबली

SCROLL FOR NEXT