Rain in jalgaon esakal
जळगाव

जळगाव : पूर्वमोसमी पावसाची हजेरी; वादळासह तुरळक पाऊस

देवीदास वाणी

जळगाव : मॉन्सूनच्या पावसाने (Pre Monsoon Rain) राज्यात हजेरी लावली असली तरी जळगावात अद्याप त्याची प्रतीक्षाच असताना रविवारी जळगाव शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह तुरळक पावसाने हजेरी लावली. जोरदार पावसाची अपेक्षा असताना किरकोळ पावसामुळे वातावरणातील उकाडा (Heat) अधिकच वाढला. (pre monsoon rains thunderstorms in jalgaon news)

गेल्या तीन- चार दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील काही भागात वादळी पावसाने केळीबागा, पिकांचे नुकसान झाले. मात्र, जळगाव शहरात तो बरसत नव्हता. शनिवारी पावसाचे वातावरण तयार झाले, मात्र तो सडा टाकूनच परतला. रविवारी पुन्हा दुपारी दोन वाजेपासून आकाशात ढगांनी गर्दी करायला सुरवात गेली. उन्हाळ्याच्या तीव्रतेत होरपळणाऱ्या जळगावकरांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा होती.

वादळी वाऱ्यासह पाऊस

दुपारपासून जळगाव शहरात पावसाचे वातावरण तयार झाले. आणि साडेतीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. पंधरा ते वीस मिनिटे तुरळक पावसाने हजेरी लावली. असे असले तरी शहरातील काही भाग मात्र कोरडाच राहिल्याचे दिसून आले. ठराविक भागातच पाऊस झाला. वादळी पावसाने शहरातील काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळपर्यंत या भागात वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.

उकाडा वाढला

काहीवेळ तुरळक स्वरुपाच्या सरी पडल्यानंतर तेवढ्या वेळेपुरता उकाड्यापासून दिलासा मिळाला. मात्र, पाऊस थांबल्यानंतर वातावरणातील उकाडा वाढला. येणाऱ्या दोन- तीन दिवसांत जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT