MLA Suresh Bhole, Dr. Ashwin Sonawane, Jayashree Mahajan
MLA Suresh Bhole, Dr. Ashwin Sonawane, Jayashree Mahajan  
जळगाव

Jalgaon Municipality: महापालिकेतून आमदारकीच्या मैदानात उतरण्याची तयारी; माजी पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांचा समावेश

कैलास शिंदे

Jalgaon Municipality : महापालिकेच्या महासभेतून थेट आमदार म्हणून राज्याच्या विधिमंडळात कार्य करण्याची संधी अनेकांना मिळाली आहे. त्यामुळे आमदारकीचा रस्ता जळगाव नगरपालिका आणि आता महापालिकेतून जातो असे म्हणतात. याच परंपरेत आता काही जणांची तयारी सुरू आहे. कोणाला संधी मिळणार हे मतदानाच्या माध्यमातून जनता ठरवेल.

जळगाव पालिका आणि आताच्या महापालिकेतील नगरसेवकपदापासून थेट आमदारापर्यंत पद भूषविले आहे. (Preparation of corporators including former office bearers to enter field of MLA from Municipal Corporation jalgaon news)

सुरेशदादा जैन यांच्यापासून ही सुरवात झाली आहे. परंतु अपवाद एकच. ते पहिल्यांदा आमदार आणि नंतर नगरसेवक व नगराध्यक्ष झाले होते. त्यानंतर आठ ‘टर्म’ त्यांनी जळगावचे आमदार म्हणून कार्य केले. त्यांचे निकटचे साथीदार असलेले ॲड. शरद वाणी जळगावचे नगरसेवक, नगराध्यक्ष होते.

तेही दोनवेळा विधानपरिषदेचे आमदार राहिले आहेत. चंद्रकांत सोनवणे हे महापालिकेचे नगरसेवक होते. त्यांनी चोपडा मतदारसंघातून आमदार म्हणून कार्य केले. त्यांच्या पत्नी लता सोनवणे या जळगाव महापालिकेत नगरसेवक होत्या. आता त्या चोपडा मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत. याशिवाय आता जळगावचे आमदार असलेले सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे हे जळगाव महापालिकेत नगरसेवक. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे विरोधी पक्षनेते होते. आता त्यांची जळगावचे विद्यमान आमदारकीची दुसरी ‘टर्म’ आहे.

निवडणुकांचे वेध आता लागले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लोकसभेप्रमाणे आता विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुकांची तयारी सुरू आहे. जळगाव विधासभेसाठी इच्छुक उमेदवारांनी आपली कंबर कसली आहे. महापालिकेतील माजी पदाधिकारी व नगरसेवकांनी तयारी सुरू केली असल्याचे दिसून येत आहे.

भाजपतर्फे आमदार सुरेश भोळे

जळगाव महापालिकेत भाजपचे विरोधी पक्षनेता म्हणून कार्य केल्यानंतर भाजपतर्फे जळगाव शहर विधानसभा निवडणुकीत दोनदा यश मिळविणारे विद्यमान आमदार सुरेश भोळे भाजपतर्फे तिसऱ्यांदा निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत.

आमदार म्हणून दोनवेळा केलेल्या विकास कामांच्या बळावर जळगाव विधानसभा मतदारसंघात आमदारकीची हॅटट्रीक करणार का? याकडे आता लक्ष असेल.

‘महाविकास’तर्फे जयश्री महाजन

माजी महापौर जयश्री महाजन यांना महापौरपदाचा अडीच वर्षांचा कालावधी मिळाला आहे. त्या माध्यमातून त्यांनी जळगाव शहराची विकासाची कामे केल्याचा दावा केला असून आता त्या जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून त्या तयारी करीत आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने त्यांची तयारीही सुरू असून त्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे दिसून येत आहे. महापौरपदावर असताना शहराच्या विकासासाठी केलेल्या कार्याच्या बळावर आपल्याला विधानसभेच्या रणांगणात यश मिळेल, असा त्यांचा दावा आहे.

भाजपतर्फे डॉ. अश्‍विन सोनवणे

महापालिकेतील भाजपचे माजी नगरसेवक, माजी उपमहापौर डॉ. अश्‍विन शांताराम सोनवणे हे जळगाव विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षातर्फे अद्याप उमेदवारी जाहीर झाली नाही. मात्र, पक्षाच्या जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांना विधानसभेची तयारी करण्याबाबत सूचित केल्याने ते तयारी करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. जळगाव विधानसभा क्षेत्रात त्यांनी नागरिकांसाठी वैद्यकीय शिबिरांसह इतर उपक्रम राबविले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT