Nashik Divisional Board Secretary Mohan Desale while guiding the meeting of principals. esakal
जळगाव

Jalgaon: कॉपीमुक्त अन भयमुक्त परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तयार करा; नाशिक विभागीय SSC बोर्ड सचिव मोहन देसले

सहाय्यक सचिव मंदाकिनी देवकर यांनी विद्यार्थ्यांच्या ओळखपत्र, परीक्षा केंद्र, पर्यवेक्षक, नियामक या संदर्भातील योग्य त्या सूचना देऊन बोर्डाच्या परीक्षा शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासंदर्भात सूचना केल्या.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : आपल्या जीवनाच्या प्रगतीसाठी शिक्षण ही जीवनावश्यक गरज आहे. ती विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या जीवनमानाला उंचावण्यासाठी नैतिक मूल्यांना अनुसरून शिक्षण देण्याच्या माध्यमातून कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रवृत्त करावे असे आवाहन नाशिक विभागीय एस.एस.सी. बोर्डाचे सचिव मोहन देसले यांनी आज येथे केले. (Prepare students for copy fear free exams Nashik Divisional SSC Board Secretary Mohan Desale Jalgaon)

मुख्याध्यापक व प्राचार्य यांच्या बैठकीत ते बोलत होते. त्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा संदर्भातील विविध अशा येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय या संदर्भात मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रवृत्त करत कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासंदर्भात सूचना केल्या.

सहाय्यक सचिव मंदाकिनी देवकर यांनी विद्यार्थ्यांच्या ओळखपत्र, परीक्षा केंद्र, पर्यवेक्षक, नियामक या संदर्भातील योग्य त्या सूचना देऊन बोर्डाच्या परीक्षा शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासंदर्भात सूचना केल्या.

माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. किरण कुवर यांनी कॉपीमुक्त परीक्षा संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी राबविलेले उपक्रम व गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी प्रयत्न करण्यासंदर्भात आवाहन केले.

उपशिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांनी उपस्थित मुख्याध्यापकांना आपल्या केंद्रावर होणाऱ्या परीक्षा संदर्भात, नवीन केंद्र संदर्भात मार्गदर्शन केले.

मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागूल, संभाजी पाटील यांनी केंद्र संचालकांना परीक्षेला येणाऱ्या अडचणी संदर्भात व प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्यासंदर्भात प्रातिनिधिक स्वरूपात भूमिका मांडली.

विभागीय मंडळाचे आर. बी. गोसावी, संजय बोरसे, शिक्षण विभागातील अधीक्षक रियाज तडवी, मुख्याध्यापक संघाचे राज्याध्यक्ष जे.के. पाटील, राजेश कोरखडे, संजय खंबायत उपस्थित होते. प.न. लुंकड कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती नेवे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन साहेबराव बागुल यांनी केले. जिल्ह्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election : गोंधळच गोंधळ! नांदेडमध्ये मतदारांना कोंडलं, अंबरनाथला बोगस मतदार आणले, तर कोपरगावात उमेदवारांमध्ये बाचाबाची

Mumbai: ठाणे-सीएसएमटी प्रवास होणार सोपा! सायन उड्डाणपुलाला समांतर दोन पदरी पूल बांधणार; नवीन मार्ग कसा असणार?

Maharashtra Govt Scheme: आनंदी बातमी! या जोडप्यांना महाराष्ट्र सरकारकडून मिळणार 1.5–2.5 लाख रुपये; अर्ज कसा करावा ते जाणून घ्या

Girish Mahajan : 'हरित नाशिक'साठी ५० हजार वृक्षांचा संकल्प; मंत्री गिरीश महाजन यांची 'होमेथॉन'ला भेट

तळोजा जेल परिसरात बिबट्याचा वावर? व्हायरल व्हिडिओचं सत्य समोर; वन विभागानं नेमकं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT