silver  sakal
जळगाव

चांदीचे दर प्रतिकिलो एक लाखांवर जाणार?

चांदीला मागणी वाढली; दिवसभरात होतेय दीडशे किलोंची विक्री

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : सध्या लग्नसराई नसली तरी सोन्यापेक्षा चांदीचे दागिने व चांदीला (Silver)ग्राहकांकडून मोठी मागणी सुरू झाली आहे. आगामी काळात चांदीचे दर (Silver Rate)प्रतिकिलो एक लाखाच्यावर (One Lakh)जाणार असल्याचा अंदाज सोने (Gold)बाजारात व्यक्त केला जात आहे. यामुळे रोज पन्नास-साठ किलोने विकली जाणारी चांदी अचानक दोन दिवसांपासून शंभर ते दीडशे किलोपर्यंत विकली जात आहे.

पैशांची अडचण असली, की घरातील सोने, चांदी विकून पैसे करून घेण्याकडे अनेकांचा कल असतो. यामुळे अनेक जण सोने, चांदीत गुंतवणूक करतात. दर कमी झाले, की सोने-चांदी घेतात आणि भाव वाढले, की विकतात.

यामुळे खरेदी-विक्री दरतील फरक म्हणजे त्यांचा नफा असे गुंतवणूकदारांचे गणित असते. काही दिवसांपासून चांदीचे दर एक लाख प्रतिकिलो जातील, असा अंदाज सोने बाजाराने वर्तविला आहे. यामुळे नागरिकांची चांदीला मागणी वाढली आहे.

शहरासह जिल्ह्यातील सराफी दुकानात अचानक चांदीला मागणी वाढणी असल्याचे व्यावसायिक सांगतात. सध्या चांदीचा दर ६४ हजार प्रतिकिलो आहे. तोच दर जर एक लाखावर गेला, तर तेवढाच फायदा या आशेने ग्राहक चांदी खरेदी करीत आहे.

सध्या लग्नसराई नाही. खरेदी करणारे येताहेत. सोन्याच्या दागिन्यांसोबतच चांदीला अधिक मागणी होत आहे. रोजच्या विक्रीपेक्षा दुप्पट तर नाही. मात्र साठ टक्के ग्राहक चांदी घेण्यासाठी येत आहे.

-मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स

चांदीच्या दरात वाढ होईल, या आशेने ग्राहकांची चांदीला मागणी वाढली आहे. मात्र ही वाढ होईल की नाही, हे येणारा काळच ठरवेल. चांदीचे दागिने, वीट खरेदीला ग्राहकांची चांगली पसंती आहे.

-भागवत भंगाळे, संचालक, भंगाळे गोल्ड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

सायनमध्ये डॉक्टरचा हायव्होल्टेज ड्रामा! नोकरीवरून काढल्याच्या रागात थेट टॉवरवर चढला अन्...; अंगावर काटा आणणारा Video Viral

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

SCROLL FOR NEXT