Kansha Wahab Sheikh aka Guddya. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : खुनाच्या गुन्ह्यात कैदी असलेला गुड्ड्या अटकेत; रेल्वेने पळून जाण्यापूर्वीच पोलिसांची झडप

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : साधारण पाच वर्षापूर्वी झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप झालेला कैदी कानशा बहाब शेख उर्फ गुड्ड्या (वय-२६, रा.तांबापुरा) कारागृहातून रजेवर सुटला आणि फरार झाला होता.

गुन्हा दाखल होताच एमआयडीसी पोलिसांनी ४८ तासांत त्याच्या मुसक्या आवळल्या असून सुरत येथे पळून जात असताना रेल्वे स्थानकावरच त्याच्यावर झडप घालत ताब्यात घेतले.(prisoner sentenced to life imprisonment for murder is arrested by police jalgaon crime news)

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत (वर्ष-२०१८) झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात गुड्डु ऊर्फ कानशा वहाब शेख याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. नाशिक मध्यवर्ती कारागृहात तो शिक्षा भोगत होता. कारागृहाच्या नियमावलीनुसार कारागृह महासंचालकांच्या सुचनेवरुन (ता.२१ नोव्हेंबरला) त्याला २१ दिवसांची संचित रजा मंजूर झाल्या करण्यात आली होती.

नियमानुसार त्याने (ता.१३ डिसेंबर) रजा संपल्यानंतर परत कारागृहात जाणे अपेक्षित असताना तो फरार झाला होता. त्यांचा संपर्कही होत नसल्याने कारागृह शिपाई महेंद्र पाटील यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात (ता.१७) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अशी झाली अटक

कानशा ऊर्फ गुड्ड्या हा अट्टल गुन्हेगार कारागृहातून फरार झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, निरीक्षक जयपाल हिरे यांनी गुन्हे शोध पथकाला त्याच्या शोधार्थ कामगिरी सोपवली होती.

उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, नितीन पाटील, किशोर पाटील, गणेश शिरसाळे, सचिन पाटील, इम्रान बेग, छगन तायडे, ललित नारखेडे, किरण पाटील, साईनाथ मुंढे अशांचे पथक त्याची माहिती काढत असतानाच गुड्ड्याला भनक लागली.

तो, रेल्वेने सुरतला पळून जाण्याच्या तयारीत रेल्वे स्थानकावर धडकला. त्याची गाडी येण्यापूर्वीच पेालिस पोहचले गुड्ड्याची ओळख पटून त्याला ताब्यात घेण्यात आले. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची कोठडीत रवानगी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

SCROLL FOR NEXT