Death News esakal
जळगाव

Jalgaon News : उपचार सुरू असताना कैद्याचा मृत्यू; 15 दिवसातील दुसरी घटना

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असताना न्यायबंदी शरीफ आलम पिंजारी (३०, रा. तळवेल) याचा गुरुवारी (ता. २९) उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दरम्यान त्याच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी कुटूंबियांनी केली आहे.

गेल्या पंधरा दिवसात कैद्याच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी अमळनेर येथील दंगलीतील संशयित अश्पाक ऊर्फ पक्या सलिम शेख (३३) याचा मृत्यू झाला होता. (Prisoner Sharif died while undergoing treatment jalgaon news)

शुक्रवारी (ता.२३) तळवेल (ता.भुसावळ) येथे नेहरू विद्यामंदिर येथून पाण्याची मोटार चोरल्याच्या संशयावरून शरीफ आलम पिंजारी याला पकडण्यात आले होते.

त्यानंतर संतापलेल्या जमावाचा मार बसल्याने तो जखमी होता. दरम्यान शाळेतून चोरीला गेलेली मोटर दुसऱ्याच दोन व्यक्तींनी मुलींच्या शाळेतून काढून आणून पोलिसांना सोपवली. असे असताना वरणगाव पोलिसांनी केवळ शरीफ आलम यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली होती. शनिवार (ता.२४) न्यायालयात हजर केल्यावर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.

न्यायालयीन कोठडीत भुसावळ कारागृहात असताना त्याला त्रास झाल्याने कारागृह अधीक्षकांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारार्थ रवाना केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानंतर रविवारी (ता.२५) शरीफ आलमच्या चुलत भावाला सहाय्यक फौजदार देविदास कमलाकर यांनी फोनवरून कळविल्यानुसार कुटूबियांनी रुग्णालयात धाव घेत गंभीर अवस्थेत असलेल्या शरीफची भेट घेतली. आज गुरुवारी (ता.२९) त्याचा मृत्यू ओढवल्याचे कुटूंबियांनी सांगितले.

चौकशीची मागणी

शरिफ आलम पिंजारी याला मारहाण करणाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, दाखल गुन्ह्यात एकट्या शरीफलाच कसे अटक करण्यात आले, त्याच्या साथीदारांना पोलिसांनी का सोडले, चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असताना त्याला अटक कशासाठी केली.

तो भुसावळ कारागृहात असताना त्याचा परस्पर जामीन झाला कसा, त्याला भुसावळ कारागृहात मारहाण झाल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचा संशय असून शरिफ पिंजारी मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी कुटूंबीयांसह शिष्टमंडळाने केली आहे. वडील आलम पिंजारी, काका शकिल पिंजारी यांनी या सर्व मुद्द्यावर लेखी तक्रार दिली असून न्यायीक चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT