जळगाव

Jalgaon Crime News : भाई का ‘बड्डे’ अन्‌ चिंग्याचा राडा; जिल्हा कारागृहात कैद्याकडून यंत्रणा वेठीस

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : जिल्‍हा कारागृहात आज सकाळी अकरा ते चारपर्यंत एका टुकार कैद्याने जेल आणि पोलिस प्रशासनालाच वेठीस धरल्याचा प्रकार समोर आला. खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा, आणि इतर गुन्ह्यांमध्ये जेल बदलून जळगावी आलेल्या चेतन सुरेश आळंदे उर्फ चिंग्या (३०) याचा कारागृहात आणि बाहेर वाढदिवस साजरा झाला.

मात्र, आजच त्याची जेल बदली होणार असल्याने तो, सकाळपासून कारागृहाच्या गेटवरच अडून बसला. कारागृह प्रशासन सोबत पोलिस प्रशासनाला तब्बल पाच तास वेठीस धरत शेवटी पोलिसांच्या दट्ट्यानंतर तो, धुळे जाण्यासाठी गाडीत जावून बसला. (prisoner violence in jail in jalgaon crime news)

जळगाव शहरात ढाकेवाडी येथील तरुणाच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेला चेतन सुरेश आळंदे ऊर्फ चिंग्या हा सध्या जिल्‍हा कारागृहात मुक्कामाला होता. तत्पुर्वी तो, नाशिक कारागृहात असताना जामिनावर बाहेर आल्यानंतर आसोदा रेाड येथे झालेल्या गोळीबार प्रकरणात दाखल गुन्ह्यात त्याला अटक झाली.

तेव्हापासून तो कारागृहात होता. सोमवारी (ता.२) चिंग्याचा वाढदिवस असल्याने मध्यरात्री बारा वाजेपासून जेलच्या बाहेर आणि ढाकेवाडी परिसरात त्याच्या टोळीतील तरुणांनी आतषबाजी करुन वाढदिवस साजरा केला. आज वाढदिवसालाच कारागृह अधिक्षकांनी त्याला धुळे कारागृहात पाठवण्याचा निर्णय घेतल्याने चिंग्याभाईचे पित्त खवळले व त्याने जेलमध्ये प्रचंड राढा घातल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

नवरदेवाप्रमाणे सरबराई

सोमवारी ११ वाजता मुख्यालयाची जेलगार्ड ड्युटीचे पोलिस कर्मचारी सुमो गाडी घेवून जेल गेटवर धडकले. तत्पुर्वी कारागृह प्रशासनाने चिंग्याला त्याचा सामान घेवुन तयार राहण्यास सांगत गेटवर आणले होते. कारागृहाचे प्रवेशद्वार आणि तीस फुटावरील आतीलद्वार याच्या मध्ये कारागृह अधीक्षक, आणि कार्यालयीन दालने आहेत.

याच पोर्चमध्ये अकरा वाजेपासून ते दुपारी चार पर्यंत चिंग्याने राडा घालत जेल व कारागृह प्रशासनास वेठीस धरले. जाणारच नाही म्हणून अडून नवरदेवाप्रमाणे खुर्चीवर जावुन बसला. दुपारचे दोन वाजल्यावर कारागृह अधीक्षकांनी जिल्हापेठ पोलिसांना फोन केल्यावर अधिकारी कर्मचारी दाखल झाल्यावर चिंग्याला दरडावल्यावर तो, जाण्यास तयार झाला.

जेलरसह स्टाफला शिवीगाळ

चिंग्याने कारागृहातील दुय्यम अधिकारी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी आदल्याच दिवशी दिली होती. आणि त्याच्यावरुनच कारागृह अधिक्षकांशी त्याचे वाजले होते अशी माहिती समोर आली आहे.

"त्याने कर्मचाऱ्यांसह दुय्यम अधिकाऱ्यांना नेहमीच दमदाट्या केल्या, त्याचा अहवाल न्यायालयाला पाठवला आहे. न्यायालयाच्या आदेशानेच त्याला कारागृह बदलून जावे लागले आहे. त्याने आज सकाळी गोंधळ घातला. जिल्‍हापेठ पोलिस निरीक्षक आल्यावर दुपारी तो, जाण्यास तयार झाला. घटनाक्रम लेखी स्वरुपात जिल्‍हा न्यायालयास पाठवला जाणार आहे." - अनिल वांडेकर, कारागृह अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT