Crime News esakal
जळगाव

Crime News: माणुसकीला काळीमा फासणारी घटना! बेदम मारहाण करत मनोरुग्णाची विष पाजून हत्या

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : गल्लीतील जुन्या भांडणाच्या कारणावरून चेतन प्रकाश चौधरी (वय २३, रा. रामेश्वर कॉलनी) याला बेदम मारहाण करून विषारी पदार्थ पाजून त्याचा खून केला.

ही घटना रविवारी (ता. ११) दुपारी घडली. एमआयडीसी पोलिसांनी तपासाअंती चार संशयितांना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. (Psychiatric patient poisoned and murdered after brutal beating jalgaon crime news)

रामेश्वर कॉलनीत चेतन चौधरी याच्यावर मानसिक उपचार सुरू असून, त्याचे गल्लीतील काही तरुणांसोबत भांडण झाले होते. याच कारणावरून रविवारी चेतन याला गल्लीतील सचिन कैलास चव्हाण (वय २३), तुषार ऊर्फ सोन्या विजय पाटील (२४), कुंदन रवींद्र पाटील (३०), सनी ऊर्फ फौजी बाळकृष्ण जाधव (३६, सर्व रा. रामेश्वर कॉलनी) यांनी बेदम मारहाण केली.

मारहाणीनंतर त्यांनी चेतनला विषारी द्रावण पाजून त्याला गल्लीत आणून पुन्हा बेदम मारहाण केली. जखमी चेतनला जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान चेतनचा मृत्यू झाला. याबाबत पूर्वी एमआयडीसी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती.

या प्रकरणाची एमआयडीसी पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर चेतनला बेदम मारहाण केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी रात्री चौघा तरुणांविरुद्ध खुनाचा दाखल करण्यात आला. त्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT