cotton  esakal
जळगाव

Jalgaon Cotton Rate : 40 हजार क्विंटल कापसाची व्यापाऱ्यांकडून खरेदी; अखेर शेतकऱ्यांकडून कापसाची विक्री

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : आंतरराष्ट्रीय स्तरावर भाव नसल्याने जिल्ह्यातील कापसाला गेल्या सहा ते सात महिन्यांपासून मागणी नाही. परिणामी, शेतकऱ्यांना हवा असलेला दहा ते तेरा हजारांचा दर मिळत नाही. (Purchase of 40 thousand quintals of cotton from traders jalgaon news)

आता नवीन खरीप हंगाम पुढे असताना, मागील हंगामाचाच कापूस घरात शिल्लक आहे. मे महिना सुरू झाल्याने खरिपाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांनी अखेर कंटाळून कापूस विक्रीस काढला आहे. बुधवारी (ता. १७) जिल्ह्यात ४० हजार क्विंटल कापसाची खरेदी व्यापाऱ्यांनी केली असल्याची माहिती जिनिंग चालकांनी दिली.

यंदा कापसाला शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला दहा ते १३ हजारांचा दर मिळाला नाही. मागील वर्षी कापूस कमी होता आणि मागणी अधिक असल्याने कापसाला दहा ते १३ हजारांचा दर मिळाला होता. यंदाही तोच दर मिळेल, या आशेने २०२२ मध्ये शेतकऱ्यांनी ११० टक्के कापसाची लागवड केली.

मात्र, कापसाची आवक सुरू झाली, तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे दर कमी झाले. परिणामी, जिल्ह्यात कापसाला आठ ते नऊ हजारांदरम्यान दर दिवाळीपर्यंत मिळाला. नंतर मात्र कापसाला साडेसात ते आठ हजारापर्यंत दर मिळाला. तो आणखी कमी होत गेला. आता तर सात ते साडेसात हजार रुपये दर आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शेतकऱ्यांनी कापसाला दहा ते तेरा हजारांचा दर मिळेल, अशी वाट आतापर्यंत पाहिली. यामुळे ७० ते ८० टक्के कापूस घरातच आहे. आता मात्र २०२३ च्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. यामुळे आता बियाणे, खते, मजुरीसाठी पैसे लागतील. यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विकण्यास सुरवात केली आहे.

जिल्ह्यातील धरणगाव, बोदवडसह अनेक ठिकाणी जिनिंग चालक कापूस विकत घेत आहेत. शेतकरी अडचणीत असला, तरी जादा भाव देणे व्यापाऱ्यांनाही परवडणारे नाही. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय कापसाला मागणी नाही.

कापसाच्या खंडीचे दर आंतराष्ट्रीय स्तरावर ६२ हजारावरून ५८ हजारांपर्यंत खाली आले आहेत. आंतराष्ट्रीय स्तरावरच दर कमी असेल, तर आम्हालाही कमी दरानेच कापूस घ्यावा लागेल, अशी माहिती जिनिंग चालकांनी दिली.

"शेतकरी कापूस उत्पादनात आघाडीवर आहे. मात्र, कापसाला आंतरराष्ट्रीय स्तरावर दर मिळत नाही. तिकडे आपल्या कापसाला मागणीच नाही. यामुळे यंदाचा जिनिंग प्रेसिंगचा हंगाम जोरात गेला नाही. आता कापसाला सात ते साडेसात हजारांपर्यंत दर आहेत." -प्रदीप जैन, अध्यक्ष खानदेश जिनिंग प्रेसिंग मिल ओनर्स असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Census 2027: मोठी बातमी! जनगणनेच्या वेळापत्रकाची घोषणा; 'या' तारखांना होणार सर्वेक्षण, काही भाग तात्पुरते वगळले; 'हे' प्रश्न विचारले जाणार

FDA Action : कालबाह्य अन्नपदार्थांची तारखांमध्‍ये छेडछाड करून पुनर्विक्री; एफडीएकडून नवीन राज्यस्तरीय आदेश लागू

Marathi News Live Updates : लासलगाव परिसरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी; एकाएकी मुसळधार बरसल्याने नागरिकांची तारांबळ!

Offline Admission : ‘ऑफलाइन’ प्रवेश देणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांना दंड, विद्यार्थ्यांना दिलासा

Container Accident : शिवना नदीच्या पुलावर कंटेनरची ट्रकला जोरदार धडक; चालक गंभीर जखमी! पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT