Theft esakal
जळगाव

PWD वित्त अधिकाऱ्याचा मुलगा ‘चोर’...साथीदारासह अटक

वडील सार्वजनिक बांधकाम विभागात वित्त अधिकारी आणि पोराचे कारनामे पाहून पहिल्यांदा पोलिसही दचकले.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी निवासस्थानातून गुन्हे शाखेने चक्क ट्रॅक्टर चोरट्याला अटक केली. अटकेतील तरुण वित्त अधिकारी संजय पाटील यांचा मुलगा आकाश असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली. त्याचा साथीदार गणेश शिंदे याच्यासह त्याला अटक करण्यात आली.

वरणगावचे उमेश चौधरी यांचा ट्रॅक्टर चोरीला गेला हेाता. ट्रॅक्टर जळगावातील दोन रेकॉर्डवरील संशयितांनी चोरल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेचे कर्मचारी विजय पाटील, सुरेश अंबोरे, राहुल पाटील, पंकज शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी निवासस्थानातून आकाश संजय पाटील याच्यासह पिंप्राळा येथील गणेश राजेंद्र शिंदे याला ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखविताच दोघांनी गुन्हा कबूल केला व चोरून आणलेले ट्रॅक्टर पोलिसांना काढून दिले.

दरम्यान, आकाश पाटील पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयित असून, यापूर्वीही त्याला जबरी चोरीत गुन्हे शोखेने अटक केली होती. वडील सार्वजनिक बांधकाम विभागात वित्त अधिकारी आणि पोराचे कारनामे पाहून पहिल्यांदा पोलिसही दचकले होते. चोऱ्या करतो, म्हणून वडिलांनी आकाशला हकलून दिल्याचेही अटक करणाऱ्या पथकाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Airport: पुरंदर विमानतळाच्या जागेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा धक्का; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

Election Commission: आयुक्तांच्या नियुक्तीबाबत दोन प्रवाह; सर्वोच्च न्यायालयामध्ये कायदेशीर काथ्याकूट

Maharashtra Drought: दुष्काळ आढाव्याला आचारसंहितेचा फटका; कृषिमंत्र्यांच्या पुणे आणि नागपूर विभागाच्या नियोजित बैठका रद्द

Latest Marathi News Live Update : दुष्काळ पाहणीसाठी दिवसभर शेतकऱ्यांचा खोळंबा; एकनाथ शिंदे अडीच-तीन तास उशिरा

Greater Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू , जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी टाकल्या उड्या

SCROLL FOR NEXT