Work on flyover in incomplete condition near Tarsod Phat. esakal
जळगाव

Jalgaon News : तरसोद ते पाळधी ‘बायपास’चे काम मार्चअखेर पूर्ण होण्याबद्दल प्रश्‍नचिन्ह

तरसोद ते फागणेदरम्यान महामार्ग चौपदरीकरणाचे काम २०१९ मध्ये सुरू झाले होते. कोरोना काळात काम पूर्णतः बंद होते.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तरसोद ते फागणेदरम्यान महामार्ग चौपदरीकरणाचे काम २०१९ मध्ये सुरू झाले होते. कोरोना काळात काम पूर्णतः बंद होते. चार वर्षे होवूनही हे काम अद्याप अपूर्ण आहे. आता पाळधी ते फागणे पर्यंतचे काम पूर्णत्वाकडे आहे. मात्र, पाळधी ते तरसोददरम्यान बायपासचे काम अपूर्ण आहे.

मार्च २०२४ अखेर हे काम पूर्ण करण्याची ‘डेडलाईन’ दिली असली, तरी अजून किमान सहा ते आठ महिने कामाला लागतील, अशी स्थिती आहे.(Question marks over completion of Tarsod to Paldhi bypass work by end of March jalgaon news)

महामार्गाचे अधिकारी व कंत्राटदार हे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना मार्चअखेर काम पूर्ण करू, असे सांगत असले, तरी तो एक ‘फार्स’ असल्याचे नागरिकांना वाटते. जळगाव शहराची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी जळगाव ‘बायपास’चे मार्च २०२४ पर्यंत काम पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या होत्या.

मात्र, सूचना महामार्गाचे अधिकारी, कंत्राटदार सोईस्करपण दुरुस्त करतात, असा अनुभव वारंवार येत आहे. तरसोद ते चिखलीदरम्यान टोलनाक्याजवळील रेल्वे उड्डाणपुलाचे काम दोन वर्षांपासून अपूर्ण आहे. तरीही टोलची वसुली सुरू आहे.

मंत्री, अधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदार व महामार्गाच्या अधिकाऱ्यांना हे काम पूर्ण करण्याच्या सूचना अनेकवेळा दिल्या. मात्र, अद्यापही काम अपूर्ण आहे. शहरातून गेलेला महामार्गावर (कालिका माता ते खोटेनगर) आकाशवाणी चौक, अजिंठा चौफुली, ट्रान्सपोर्टनगर येथे उड्डाणपुलाची गरज होती. अद्याप तो तयार झालेला नाही. ‘डीपीआर’ही तयार नाही.

तरसोद ते पाळधी ‘बायपास’ कामात भराव कामासाठी दीडलाख टन माती, मुरूम आवश्यक आहे. त्यावर अजून हालचाली नाहीत. तरसोद फाट्याजवळील उड्डाणपुलाचे काम दोन महिन्यांपासून पूर्णतः बंद आहे. एकेरी मार्गावरून वाहने न्यावी लागत आहेत. अनेक ठिकाणी त्यात खड्डे आहेत. खड्डे चुकविताना वाहनधारकांची दमछाक होत आहे.

अठरा किलोमीटरचा ‘बायपास’

तरसोद ते पाळधी हा अठरा किलोमीटरचा ‘बायपास’ आहे. राष्ट्रीय महामार्ग ‘बायपास’च्या मार्गावर अनेक लहान-मोठी गावे आहेत. त्यात तरसोद, असोदा, भोकणी, आव्हाणे, मुमुराबाद, जळगाव शिवार, पाळधी आदींचा समावेश आहे. ‘बायपास’ अंतर्गत तीन ठिकाणी उड्डाणपूल तयार करण्यात येत आहेत.

गिरणा नदीवरील तीनशे मीटरच्या पुलाच्या कामाची गती धिम्मी आहे. ‘बायपास’चा पूर्ण रस्ता अद्याप कच्चा आहे. त्यात भराव केव्हा टाकणार आणि नंतर डांबरीकरण केव्हा होणार? त्यास तीन ते चार महिने लागतील. कंत्राटदाराने मजुरांची संख्या वाढविली अन् रात्र-दिवस काम केल्यास मार्चअखेर काम पूर्ण होईल. अन्यथा आणखी मुदतवाढ, आणखी नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT