esakal
जळगाव

Jalgaon Crime News : शहराच्या मध्यवर्ती भागात कुंटणखाना; बसस्टॅण्डशेजारील लॉजवर छापा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : मध्यवर्ती बस स्टॅण्डशेजारीच भजेगल्लीत ‘लयभारी’ नावाने चालवल्या जाणाऱ्या लॉजवर चक्क बंगाली तरुणींना आणुन कुंटणखाना सुरु करण्यात आला होता.

जिल्‍हापेठ पोलिस ठाण्याच्या महिला अधीकाऱ्यांसह पथकाने मंगळवारी (ता. १२) या ठिकाणी छापा टाकून ५ बंगाली तरुणींसह चार संशयीतांना अटक केली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. (raid at lodge near bus stand jalgaon crime news)

जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोपडा मार्केट येथील लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर जिल्हापेठ पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत ५ महिलांसह पाच ते सहा पुरुषांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.

नवीन बसस्टॅण्डशेजारील भजेगल्लीतील ‘लयभारी’ नामक लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथक तयार करून खात्रीशीर माहिती घेत चोपडा मार्केट येथे रवाना केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मीरा देशमुख, सलीम तडवी, रवींद्र साबळे, तुषार पाटील, जयेश मोरे, महिला पोलिस मनीषा बिरारी आणि कल्पना मोटे यांच्या पथकासह बनावट ग्राहक म्हणून एका पंटरला पैसे देऊन तेथे पाठविण्यात आले. पंटर आत शिरल्यानंतर त्याला मुली दाखवुन एका खोलीत पाठविण्यात आले. त्याने तेथून मोबाईलवरुन मिसकॉलचा सिग्नल देताच पथकाने अचानक छापा टाकला.

पोलिस पथकाला त्या ठिकाणी ५ महिला व काही पुरुष असल्याचे आढळून आले. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत रात्री उशिरापर्यंत वैद्यकीय तपासणी, गुन्हा दाखल करणे व अटकेची कारवाई सुरू होती. गुन्हा दाखल झाल्यानंतरच संशयीतांची नावे आणि कारवाईची नेमकी माहिती देता येणार असल्याचे निरीक्षक डॉ. जयस्वाल यांनी पत्रकारांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart Sale : डीमार्टमध्ये कोणत्या दिवशी वस्तू खरेदी करणे जास्त स्वस्त आणि फायद्याचे ठरते? जाणून घ्या एका क्लिकवर

Bihar Government: गृहखातं हातातून निसटलं, पण 'हे' मलाईदार विभाग नितीश कुमारांच्या 'जेडीयू'कडे

Sale : सारा जमाना Zudio का दिवाना! पण फक्त झुडिओ नाही, तर टाटाच्या 'या' 5 दुकानांमध्ये मिळतोय हजारोंचा डिस्काउंट; स्पेशल ऑफर्स पाहा

Gondia Crime : वडिलाचा मुलीवर लैंगिक अत्याचार; अत्याचार पीडित मुलीने एका बाळाला दिला जन्म

Gadchiroli News : मारेदुमिल्ली जंगलातील चकमक ‘खोटी कथा’; आमच्या कार्यकर्त्यांना बनावट एनकाउंटरमध्ये मारले—माओवादी पत्रकाचा आरोप!

SCROLL FOR NEXT