Citizens giving a statement to District Collector demanding start of work in Shivaji Nagar 'T' shaped bridge esakal
जळगाव

Jalgaon : ‘T’ आकाराच्या पुलाच्या कामासाठी मोर्चा; तीव्र आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शिवाजीनगर पुलाच्या ‘टी’ आकाराचे काम त्वरित सुरू करावे, या मागणीसाठी नागरिकांनी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. काम त्वरित सुरू करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

शिवाजीनगर भागातील पुलाला ‘टी’ आकारात मंजुरी होती, यासाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे. मात्र काही कारणास्तव तातडीने ‘वाय’ आकाराचा पूल तयार करण्यात आला. तो सुरू होण्यासही बराच विलंब लागला, मात्र आता हा पूल वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. यामुळे शिवाजीनगरातील साळुंखे चौक तसेच इतर भागातील नागरिकांना या पुलावर जाण्यासाठी वळसा घालून जावे लागत आहे. (Rally for T shaped bridge work Warning of Severe Agitation Jalgaon News)

त्यातच आता शिवाजीनगरातून गावात पायी जाण्यासाठी देवकर निवासजवळील रेल्वे रूळ ओलांडून जाण्याचा मार्ग होता, मात्र आता रेल्वे प्रशासनातर्फे हा मार्गही बंद करण्यात येत आहे. पायी जाणाऱ्या नागरिकांचे हाल होणार आहेत. त्यामुळे आता ‘टी’ आकाराच्या पुलाची आवश्‍यकता आहे. या मागणीसाठी नागरिकांनी निवेदन दिले.

बुधवारी शिवाजीनगर वज्रेश्वरी मंदिर येथून माजी शिवसेना विभागप्रमुख विजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली व स्थानिक त्रस्त नागरिकांकडून जिल्हाधिकारी कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथे मोर्चा काढण्यात आला.

छत्रपती शिवाजीनगरमधील चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ‘टी’ आकाराच्या पुलाचा मुख्य मुद्दा तसेच रहिवासी भागाकडील बोगदा, समांतर रस्ते, पुलाखालील जिन्याचा प्रश्न व इतर समस्यांसंदर्भात जिल्हाधिकारी व पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असता वरील मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.

या वेळी शिवसेनेचे विजय राठोड, जहाँगीर खान, सचिन राणा, राकेश बाविस्कर, भूषण कोष्टी, अकील पैलवान, अरुण शिंदे, सय्यद जमील सय्यद हबीब, समीर खाटीक, रेखा अलोने, प्रतिभा गवळी, अनिता देवरे, पार्वती गवळी, लीलाबाई गवळी, सुनीता गवळी, उमर शेख, सुमीत पंडित, रफीक शेख यांच्यासह शिवाजीनगरमधील नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT