Balaji Rathotsav : सुमारे १९० वर्षांची आदर्श व अखंडीत परंपरा असलेला येथील श्री बालाजी महाराजांचा रथोत्सव रविवारी (ता. २६) वैकुंठ चतुर्दशीला साजरा होत आहे. यानिमित्ताने धार्मिकतेला उधाण आले आहे.
पाचोरा, पारोळा, नगरदेवळा येथील कुशल कारागिरांनी सागवानी लाकडापासून तयार केलेला रथ ३० फूट उंच आहे. (Rathotsav of Balaji Maharaj today at Pachora jalgaon news )
रथावर सुंदर कोरीव नक्षीकाम करण्यात आले असून रथोत्सवाच्या दिवशी त्यावर कळस ठेवला जातो. अग्रभागी लाकडी घोडे व सारथी म्हणून अर्जुनाची मूर्ती स्थापित केली जाते. दोन्ही बाजूस चोपदारांच्या मूर्ती उभ्या केल्या जातात. रथाच्या मागील बाजूस राक्षसाची मूर्ती स्थापित केली जाते. पुढील भागात कळसाच्या खाली परी व हनुमानाची मूर्ती बसवली जाते.
रथाच्या चारही बाजूला भगवे ध्वज, पताका, केळीचे खांब, ऊस, झेंडूच्या फुलांच्या माळा लावून तसेच विद्युत रोषणाई करून रथ सुशोभित केला जातो. रथोत्सवाच्या तीन दिवस अगोदर रथाची साफसफाई सुरू होते. दरम्यान, शनिवारी रात्री रथमार्गावरून श्री बालाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली.
धार्मिक विधी व दैनंदिन पूजा अर्चा करण्याचा मान प्रमोद जोशी यांच्याकडे असून राघो पाटील यांच्या घराण्याला चोपदाराचा मान आहे. त्यांचे नातू प्रा. गिरीश पाटील हे पारंपरिक पेहरावात चोबदाराची कामगिरी पार पाडतात.
रथ थांबवणे व वळवण्यासाठी लाकडी मोगऱ्यांचा उपयोग केला जातो. मोगरी लावण्याचे जोखमीचे काम अशोक वाडेकर, सुहास सोनवणे व त्यांचे कुटुंबीय करतात. रथापुढे पारंपरिक पद्धतीने मशाली लावण्याची जबाबदारी परशुराम अहिरे व नितीन शिरसाट पार पडतात.
सहा तास मिरवणुकीचे नियोजन
बालाजी मंदिरापासून दुपारी दोनला मिरवणुकीला सुरवात होते. विठ्ठल मंदिर रोड, तलाठी कार्यालय, जामनेर रोड, महात्मा गांधी रोडमार्गे रथयात्रा फिरवून रात्री दहाच्या सुमारास रथोत्सवाची सांगता होते.
बालाजी महाराजांचा जयघोष करीत लोकसमुहाद्वारे रथ ओढला जातो. प्रसाद म्हणून भाविकांना केळी व नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. रथ मार्गात भाविक व व्यापारी रथाची विधीवत पूजा करतात. रथोत्सवानिमित्ताने जामनेर रोड, आठवडे बाजार, गांधी चौक भागात यात्रा भरते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.