Jalgaon Collector Office
Jalgaon Collector Office esakal
जळगाव

Jalgaon News : रेमंड कंपनीला अखेर ठोकले टाळे; जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जमावबंदी लागू

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : औद्योगिक वसाहतीतील रेमंड वस्त्रोद्योग कंपनीला प्रशासनाने (Administration) टाळे ठोकले आहे. गेल्या चार दिवसांपासून खानदेश उत्कर्ष संघटनेने कंपनी परिसरात संप पुकारला आहे. (Raymond Textile Company in industrial estate has been locked by administration jalgaon news)

कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनी आवारात जमावबंदी लागू केली असून, पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे.

औद्योगिक वसाहतीतील रेमंड कंपनीबाहेर निदर्शने करणाऱ्या कामगारांची भेट घेतली असता, २०१८ मध्ये कामगारांना दिलेला कराराच २०२३ मध्ये देण्यात येत आहे. त्याला खानदेश उत्कर्ष कामगार संघटनेचा विरोध होता. जुन्याच करारावर काम करण्यासाठी व्यवस्थापनातर्फे दबाव आणि आठ कामगारांना निलंबित केल्याने वाद चिघळल्याचे कामगारांनी सांगितले.

कामगारांच्या वेतनवाढीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी कामगारांनी कामावर बहिष्कार टाकल्याचे आंदोलक कामगारांनी सांगितले. कंपनी प्रशासनाने वेतनवाढ न करता कंपनी प्रशासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे काम करावे लागेल, अशा सूचना दिल्या आहेत.

शिवाय करारावर स्वाक्षऱ्या केल्याशिवाय कंपनीत काम करण्यास मनाई केली आहे. कंपनीच्या नव्या कराराला कामगारांनी विरोध दर्शविल्याने कंपनी प्रशासनाने चार दिवसांपासून मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावले असून, कंपनी बंद ठेवली आहे, असे सांगण्यात आले.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

जोरदार घोषणाबाजी

कामगार उत्कर्ष संघटनेने कंपनीच्या आवारात दुपारी दोनला द्वारसभा घेतली. संघटनेचे अध्यक्ष ललीत कोल्हे यांच्यासह अडीचशे कामगार हजर होते. कंपनी व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र जोशी यांच्या आडमुठेपणामुळे वाद वाढत गेल्याचेही श्री. कोल्हे यांनी या वेळी सांगितले. कंपनी गेटवर कामगारांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान, रेमंड वस्त्रोद्योग कंपनीत अनधिकृत संघटनेने बेकायदेशीर संप पुकारून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची खात्री झाल्याने फौजदार प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये कंपनी परीक्षेत्रात गर्दी गोळा करणे, अनोळखी व्यक्तींचा संचार प्रतिबंधीत करण्याचे आदेश प्रांताधिकारी महेश सुधळकर यांनी दिले आहेत.

"कामगारांना ज्या करारानुसार वेतन देणार आहेत. ते आम्हाला समजवून सांगा, अशी रास्त मागणी केली होती. कामगारांनी कुठलाही संप पुकारला नसून व्यवस्थापनाने पोलिसांना बोलावून कंपनीला टाळे ठोकले आहे. व्यवस्थापनाने गरीब कामगारांचा विचार करावा, अशी आमची भूमिका आहे." -ललीत कोल्हे, अध्यक्ष, रेमंड कामगार संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT