Groundnut pod  esakal
जळगाव

Jalgaon Bazar Samiti : चाळीसगावला भूईमुगाच्या शेंगांना मिळाला 'इतका' विक्रमी भाव!

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Bazar Samiti : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. १२) शेंगांना हंगामात सर्वाधिक प्रतिक्विंटल रूपये ८३५० असा विक्रमी भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव जगदीश लोधे यांनी एका पत्रकान्वये प्रसिद्धीस दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे, की जळगाव जिल्ह्यातील भुसार मालासाठी प्रसिद्ध असलेली चाळीसगाव बाजार समिती कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच दर शनिवारी भरणारा येथील गुरांचा बाजार देखील प्रसिद्ध आहे. (Record price of groundnut pods in Chalisgaon jalgaon news)

सुमारे २०० कोटींची उलाढाल असलेल्या या बाजार समितीमध्ये ज्वारी, बाजरी, मका, गहू, हरभरा आदी शेतमालाबरोबरच शेंगा या शेतीमालाचा लिलाव देखील केला जातो.

एकेकाळी शेंगा या शेतीमालासाठी येथील बाजार समिती प्रसिद्ध होती. परंतु काळानुरूप शेती पिकांमध्ये बदल होत गेले आणि शेंगांची आवक कमी झाली. कांदा व कापूस या नगदी पिकांकडे शेतकरी बांधवांचा कल वाढला. परंतु कांदा व कापूस या नगदी पिकांचीही हमी नसल्यामुळे काही शेतकरी बांधव शेंगा हे पीक घेतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यापासून गुरांना पाला मिळतो, म्हणजेच गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटतो. दरम्यान, बुधवारी (ता. १२) बाजार समितीमध्ये शेंगा या शेतमालाला चालू हंगामातील विक्रमी प्रतिक्विंटल ८३५० रुपये भाव मिळाल्याने शेतकरी राजा आनंदी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

शिंदी येथील शेतकरी महेंद्र सूर्यवंशी यांच्या शेंगांना आज हंगामातील विक्रमी भाव मिळाल्याने ते आनंदी व समाधानी झाल्याचे चित्र त्यांच्या चेहऱ्यावर पाहावयास मिळाले. तालुक्यातील शेतकरी बांधवांनी भुईमूग शेंगा शेतीमाल बाजार समितीमध्ये विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती कपिल पाटील, उपसभापती साहेबराव राठोड व संचालक मंडळाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT