watermelon
watermelon esakal
जळगाव

युवा शेतकऱ्याची नाविन्यपूर्ण शेती; टरबुजाचे एकरी 30 टन विक्रमी उत्पादन

सकाळ वृत्तसेवा

न्हावी (ता. यावल) : तापी पट्ट्यातील यावल, रावेर आणि इतर तालुक्यात केळी पिकाला पर्याय म्हणून कोणी अद्रक तर कोणी हळदीचे उत्पादन घेत असल्याचे दिसून येते. परंतु न्हावी येथील युवा शेतकरी सचिन इंगळे यांनी पारंपरिक पीक पद्धतीत बदल करीत आपल्या शेतात टरबुजाची लागवड केली. त्यांनी या पिकातून ४५ दिवसांत एकरी ३० टनाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. शेतात पारंपरिक पिकाच्या पलीकडे जाऊन तंत्रज्ञान व नाविन्यपूर्ण शेतीचा प्रयोग केल्यास आपण चांगले उत्पादन घेऊ शकतो, हे श्री. इंगळे यांनी दाखवून दिले आहे.

टरबूज या हंगामी पिकाचे युवा शेतकरी सचिन इंगळे हे विक्रमी उत्पादन घेत असून, एकरी सुमारे ३० टनातून असे विक्रमी उत्पादन घेत आहेत. युवा शेतकरी सचिन इंगळे यांना यांना काहीसा दिलासा मिळाला असून, चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून येत आहे. योग्य नियोजन, तंत्रशुद्ध आणि अभ्यासपूर्ण शेती करत सचिन इंगळे यांनी ४५ दिवसांत प्रेरणादायी ठरेल, असे टरबूजाचे उत्पादन घेतले आहे. टरबूजाचे एक फळ जवळपास ८ ते ९ किलो वजन देत आहे, असे श्री. इंगळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

श्री. इंगळे यांना मुंबई येथील विजय महाजन यांचे मार्गदर्शन मिळत असून, त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर तज्ज्ञ व्यक्तींना बोलावून मार्गदर्शनाचा लाभ दिला. योग्य आणि अचूक मार्गदर्शन तसेच पाणी व्यवस्थापन, खते आणि कीड रोग व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करण्यात आले. शेकडो शेतकऱ्यांनी सचिन इंगळे यांचे कौतुक केले आहे. अनेक जण त्यांच्या शेतात भेट देऊन उत्पन्नासंदभातील माहिती जाणून घेत आहेत. सध्या उत्पादन निघत असून, या याप्रसंगी जालनाचे किरण निकम, राहुल पवार, संजय भोई, ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी व केळी उत्पादक टेनू बोरोले, लक्ष्मण चौधरी, चंद्रशेखर पाटील, तुषार वाघुळदे यांची उपस्थिती होती.


एकाच पिकाच्या मागे न लागता आंतरपीक घ्या : सचिन इंगळे

प्रत्येक शेतकऱ्याने एकाच पिकाच्या मागे न लागता वेगवेगळे प्रयोग करून आंतरपिके घेतली पाहिजे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास यामुळे मदत होते, असेही ते म्हणाले. टरबुजाच्या शेतीत त्यांनी केळी हे आंतरपीक घेतले आहे. पाच एकरमध्ये टरबुजाचे संकरित वाण लावले असून, फळांची काढणी सुरू आहे. फक्त ५० ते ५५ दिवसात टरबुजाचे भरघोस उत्पन्न येत असते. एकरी साधारणतः अडीच ते तीन लाखाचा नफा होत असतो, असेही इंगळे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedarnath: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, यात्रेकरू थोडक्यात बचावले...थरारक व्हिडिओ पाहा

मागच्या वर्षी 1 हजार, पण यंदा 10 हजार टँकर, सरकारचं दुष्काळाकडे लक्ष नाही; शरद पवारांची टीका

Sharmin Segal: "ती माझी भाची आहे म्हणून नाही तर..."; 'हिरामंडी'मध्ये शर्मीनला कास्ट करण्यावर अखेर भन्साळींनी सोडलं मौन

Pune Porsche Accident: 'कारमध्ये 4 जण होते, ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला'; पुणे पोलीस आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती

Team India Coach: 'दबाव अन् राजकारण...', भारताच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेबद्दल केएल राहुलने ऑस्ट्रेलियन दिग्गजाला काय दिला सल्ला?

SCROLL FOR NEXT