Reimbursement of 542 claims by Bhusawal Railway Hospital  esakal
जळगाव

Jalgaon News : भुसावळ रेल्वे रुग्णालयातर्फे 542 दाव्यांची प्रतिपूर्ती

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : भुसावळ रेल्वे रुग्णालय रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. रेल्वे कर्मचारी येथे उपचार घेतात. रेल्वे रुग्णालयाकडे यंदाच्या आर्थिक वर्षात वैद्यकीय प्रकरणांच्या प्रतिपूर्तीसाठी एकूण ६२८ दावे प्राप्त झाले होते. (Reimbursement of 542 claims by Bhusawal Railway Hospital jalgaon news)

त्यातील ५४२ दाव्यांची प्रतिपूर्ती करण्यात आली आहे. प्रक्रियेंतर्गत ८६ दावे असून, ८६ टक्के उत्तीर्ण दावे आहेत.

भुसावळ रेल्वे हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आनंद व्ही. कांबळे, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता मोहित मांडलेकर रेल्वे रुग्णालयाचे नेतृत्व करीत आहेत. रेल्वे रुग्णालयातर्फे रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या एक हजार ४५६ उमेदवारांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

त्यात १४७ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ‘एचएमआयएस’ सॉफ्टवेअर (HMIS- हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम) द्वारे संगणकीकृत वैद्यकीय डेटा रेकॉर्ड ठेवण्याची अंमलबजावणी डिसेंबर २०२२ पासून सुरू झाली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

चार हजार ९२८ वॅगनची दुरुस्ती

रेल्वेच्या यांत्रिकी विभागाने २०२२-२३ वर्षातील कामगिरीमध्ये आरओएच वॅगन आउट टर्न- अंतर्गत आरओएच ही माल वॅगनची नियमित दुरुस्ती व देखभाल केली. भुसावळ माल यार्डमध्ये तपासणी होते. चार हजार ९२८ वॅगनची तपासणी पूर्ण केली आहे. भुसावळ गुड्स यार्डमध्ये आजारी मालाच्या वॅगनची देखभाल केली जाते.

भुसावळ यार्डमध्ये सात हजार ४०९ आजारी वॅगन तंदुरुस्त करण्यात आल्या आहेत. गुड्स ट्रेनची रुटीन परीक्षा कमी वेळेत झाली. ४२ वॅगनच्या एका मालगाडीची तपासणी करण्यासाठी फक्त ५.४५ तास लागले. मेल एक्स्प्रेस कोचचे २५ डबे भंगारात दोषी ठरले आहेत. या वर्षात ३४ डिझेल इंजिन निकामी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT