Rigorous imprisonment for 7 years for sexually assulting women jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : महिलेवर अत्याचार करणाऱ्यास 7 वर्षे सश्रम कारावास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : पाचोरा तालुक्यातील महिलेवर अत्याचार करून गर्भवती केले होते. या गुन्ह्यातील आरोपी आबा ऊर्फ शंकर देविदास भिल यास जिल्‍हा व सत्र न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावली. (Rigorous imprisonment for 7 years for sexually assulting women jalgaon crime news)

आरोपी शंकर भिल याने २०१८ मध्ये नवरात्रीत महिलेला शेतात बोलावून तीन दिवस अत्याचार केला, तसेच ही घटना कुणाला सांगितली, तर जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर काही दिवसांनी पीडित महिला गर्भवती असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

तपास करून तपासाधिकाऱ्यांनी जिल्‍हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश शरद पवार यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे एकूण १० साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. पीडित महिलेने प्रसंग आदिवासी भाषेत कथन केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

न्यायालयात जबाब नोंदविताना अनुवादक म्हणून शोभा पाटील यांनी सहकार्य केले. शिवाय पीडित महिला, तिचे बाळ आणि आरोपीचे डीएनए जुळून आले. प्राप्त पुरावे, साक्षीदारांची साक्ष आणि नवजात बाळाचा डीएनए अहवालावरून आरोप सिद्ध झाला.

न्यायाधीश शरद पवार यांनी आरोपी आबा ऊर्फ शंकर देविदास भिल याला दोषी ठरवून ७ वर्ष सश्रम कारावास आणि दोन हजार रुपयांचा दंड सुनावला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी प्रभावी युक्तिवाद केला, तर पैरवी अधिकारी हर्षवर्धन सपकाळे यांनी सहकार्य केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT