jalgaon muncipal corporation esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : शहरातील रस्त्याच्या कामाची होणार तपासणी; शहर अभियंत्यातर्फे यादी समितीकडे सादर

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality News : शहरातील रस्त्याच्या कामाची तपासणी करण्यात येणार आहे, महापालिकेतर्फे स्थापन करण्यात आलेल्या तीन जणांच्या समितीतर्फे कामाच्या दर्जाची तपासणी करून आयुक्तांना अहवाल देण्यात येणार आहे. (Road work in city will be inspected by municipal corporation jalgaon news)

जळगाव शहरात महापालिका निधीतून महापालिकेच्या मक्तेदारातर्फे तसेच शासनाच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मक्तेदारातर्फे रस्त्यांची कामे करण्यात आली. महापालिकेतर्फे या रस्त्याच्या दर्जाची तपासणी करण्यात येणार आहे.

यासाठी महापालिकतर्फे उपायुक्त अश्‍विनी भोसले व अभियंता प्रकाश पाटील, नरेंद्र जावळे यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. ही समिती प्रत्यक्ष जागेवर जावून रस्त्याच्या कामाची पाहणी करणार आहे. तसेच त्याबाबतचा अहवाल महापालिका आयुक्तांना देण्यात येणार आहे.

शहरातील काही रस्त्याच्या कामाची या समितीने पाहणी केली आहे. मात्र मध्यंतरी कामे बंद असल्यामुळे त्यांनी तपासणी केली नव्हती, आता काही रस्त्याची कामे झालेली आहेत शहर बांधकाम विभागातर्फे त्याची यादी करण्यात आली आहे.

याबाबत माहिती देतांना अधिकाऱ्यांनी सांगितले, रस्त्याच्या कामाच्या दर्जाची तपासणी करण्यात येईल, त्यात काम निकृष्ट आढळल्यास संबधित मक्तेदारांना काम पुन्हा करण्याचे आदेश देण्यात येतील, या आदेशानंतरही मक्तेदाराने काम केले नाही तर संबधित कामाची दंड आकारणी करून त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे.

''शहरात महापालिका तसेच शासकीय निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कामे करण्यात आलेली आहेत.याकामाची यादी तयार करण्यात आली आहे. रस्ते कामाच्य तपासणीसाठी ही यादी समितीकडे देण्यात येणार आहे.''-चंद्रकांत सोनगिरे, शहर अभियंता, महापालिका जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT