Sanjay Sawant Statement against Gulabrao Patil esakal
जळगाव

गद्दार गुलाबरावांचा स्मृतिभ्रंश झाला : संजय सावंत

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : निवडणुका कशा लढवाव्या हे काल आपल्यासोबत बसून समजून घेत होते, तेच म्हणतात निवडणूक कशा लढवाव्या लागतात हे आम्हाला माहीत नाही. सुरत, गुवाहाटी, गोवा फिरून गद्दार आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचा स्मृतिभ्रंश झाला आहे, असा सणसणीत टोला शिवसेना (Shiv sena) जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी लगावला आहे. (Sanjay Sawant statement about gulabrao patil jalgaon political Latest Marathi news)

युवा सेनेच्या प्रमुखांना विभागप्रमुख पदाची अपेक्षा होती, ते पद न मिळाल्याने ते पळाले, असा आरोपही त्यांनी केला आहे. हॉटेल के. पी. प्राईड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, महापालिकेचे शिवसेना विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे आदी उपस्थित होते. संजय सावंत म्हणाले, जे आमदार शिवसेना सोडून गेले, ते बंडखोर नव्हे गद्दार आहेत.

हेच गद्दार मर्दुमकीची भाषा करीत आहेत. त्यांनी अगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा. त्यानंतरच अशा घोषणा कराव्यात. निवडणुका लढविणे काय असते ते नेत्यांना कळत नाही, या गुलाबराव पाटील यांच्या आरोपाला उत्तर देताना सावंत म्हणाले, सुरत, गुवाहाटी, गोवा फिरून त्यांचा स्मृतिभ्रंश झाला आहे.

निवडणुकीच्या अगोदर आपल्याजवळ बसून हेच गुलाबराव पाटील रणनीती काय हे समजून घेत होते. आता तेच म्हणत आहेत. निवडणुका कशा लढवाव्या हे यांना कळत नाही. त्यांनी अगोदर मागील सर्व आठवावे.

आदित्य ठाकरेंवर गुलाबराव पाटील यांनी टीका करीत म्हटले होते, की आदित्य यांनी हेच दौरे अगोदर केले असते तर शिवसेना बळकट झाली असती. त्यावर सावंत म्हणाले, की गुलाबराव तुम्ही शिवसेनेत असताना आपला तालुका सोडून जिल्हाभरात शिवसेना बळकट केली असती तर तुमच्या तालुक्याच्या कार्यकर्त्यांवरच तुम्हाला मर्यादित रहावे लागले नसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT