Sanskrit Shastri Sammelan to Faizpur from 18 march jalgaon news esakal
जळगाव

Sanskrit Shastri Sammelan : फैजपूरला उद्यापासून संस्कृत शास्त्री संमेलन; 500 संतांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा

फैजपूर (जि. जळगाव) : भारतातील एकमेव संस्कृत महाविद्यालय श्रीचक्रधर गुरुकुलच्या नूतन इमारतीचे उद्घाटन समारंभ तथा संस्कृत शास्त्री संमेलन १८ व १९ मार्चला आयोजित करण्यात आले आहे. (Sanskrit Shastri Sammelan to Faizpur from 18 march jalgaon news)

या कार्यक्रमाला भारतभरातून पाचशे महानुभाव पंथाचे पाचशे संत उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आचार्य मानेकर बाबा शास्त्री यांनी दिली.

श्री चक्रधर गुरुकुल महाविद्यालय येथे आज सायंकाळी पाचला झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आचार्य मानेकरबाबा शास्त्री म्हणाले, की श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयाची स्थापना फैजपूर येथे १९६१ मध्ये झाली. हे महाविद्यालय ६२ वर्षांपासून अस्तित्वात असून, दोनशे शास्त्री यांनी संस्कृत शास्त्री पदवी नागपूर विद्यापीठ अंतर्गत प्राप्त केली आहे.

आता श्रीचक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालय फैजपूर या नूतन इमारतीचे उद्घाटन तथा संस्कृत शास्त्री संमेलन १८ व १९ मार्चला होणार आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमाला भारतभरातून पाचशे महानुभाव पंथाचे पाचशे संत उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यात प्रामुख्याने आचार्य विंदवांस बाबा शास्त्री (फलटण) हे राहणार आहेत. तर आचार्य बाभुलगावकरबाबा शास्त्री (करमाड), आचार्य खामणीकरबाबा (कनाशी), आचार्य नागराजबाबा शास्त्री (छत्रपती संभाजीनगर), आचार्य राहेरकर बाबा, आचार्य संतोषमुनी शास्त्री (छत्रपती संभाजीनगर), आचार्य रिधपूरकर शास्त्री, श्री. आचार्य प्रवर न्यायबास बाबा,

श्री. आचार्य प्रवर माहूरकर बाबा हे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी नूतन इमारत उद्घाटन सुशील बाफना (जळगाव) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर संमेलनात २५० ते ३०० शास्त्रीचा समावेश होणार आहे. यावेळी पत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष वसंत महाजन, प्राचार्य राजधर शास्त्री, उपप्राचार्य कृष्णराज शास्त्री, राज शास्त्री, साहित्यचार्य राजधरबाबा शास्त्री, डॉ. प्रा. गोविंद शास्त्री जामोदेकर, हरिपाळ शास्त्री राहेरकर हे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT