Speaking at the inauguration of the renovation of Sant Muktai Udyan in Police Colony Superintendent of Police M. rajkumar  esakal
जळगाव

Jalgaon News : पोलिस वसाहतीतील संत मुक्ताई उद्यानाचे पुनरुज्जीवन; डॉ. डाबी दांपत्याचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : देखभालीअभावी भकास झालेल्या पोलिस वसाहत २७२ मधील संत मुक्ताई उद्यानाचे डॉ. राजेश डाबी यांच्या पुढाकारातून नूतनीकरण करण्यात आले. ते बालगोपालांसाठी खुले करण्यात आले. (Sant Muktai Udyan Renovation was done at initiative of dr Rajesh Dabi jalgaon news)

या वसाहतीत काही वर्षांपासून संत मुक्ताई उद्यान तयार करण्यात आले. मात्र, काही अडचणीमुळे देखभालअभावी रया गेली होती.

डॉ. डाबींचा पुढाकार

प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. राजेश डाबी यांच्या पत्नी अमिषा डाबी यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी पुढाकार घेऊन उद्यानाचे कुंपण दुरुस्ती, रंगरंगोटी, लॅम्प पोस्ट वायरिंग, पाईपलाइनचे काम करून घेतले. मुख्य म्हणजे बागेत सुमारे २५० विविध झाडांच्या रोपे लावली व त्याला ठिंबक बसविली. आगामी पावसाळ्यात काही भागात लॉन लावली जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

उद्यानाचे लोकार्पण

नूतनीकरण झालेल्या या उद्यानाचे लोकार्पण पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या हस्ते मंगळवारी (ता. १६) सकाळी करण्यात आले. डाबी दांपत्याने स्वत: पुढाकार घेऊन केलेल्या कार्याबद्दल त्यांनी कौतुक केले. भविष्यातही संत मुक्ताई उद्यान सुव्यवस्थित देखभालसाठी संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.

शिवाक्ष फाउंडेशनच्या उपाध्यक्षा अमिषा डाबी यांनी आभार मानले. या वेळी विशेष सहकार्याबद्दल पोलिस नाईक लक्ष्मण पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी उपअधीक्षक संदीप गावित, दीपस्तंभ फाउंडेशनचे संचालक यजुर्वेंद्र महाजन, सौ. कोठारी, पोलिस अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते संजय कुलकर्णी, राजेश नाईक, स्वाती कुलकर्णी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शेवटचा..., बूटफेकीच्या घटनेनंतर काय म्हणाले सरन्यायाधीश? सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Gautami Patil: अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये होती का? पुणे पोलिसांनी तपासले शंभर सीसीटीव्ही

Rahul Dravid Son: ४८ ब्राऊंड्री अन् ४५९ धावा... द्रविडच्या धाकट्या लेकाच्या कारनामा; KSCA कडून झाला मोठा सन्मान

पालघरमधील तीन नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर! डहाणूत सामान्य, जव्हारमध्ये सर्वसाधारण महिला तर पालघरमध्ये ओबीसीचे आरक्षण

विनोद खन्नांचा मृत्यू कसा झालेला माहितीये? ६ वर्ष जगापासून लपवलेलं ते सत्य; एकटेच कुढत काढलेले दिवस, अखेर...

SCROLL FOR NEXT