Death News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : जेष्ठ नागरीकाचा धावत्या रेल्वेखाली मृत्यु

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत एकाने आत्महत्या केली. त्याचा मृतदेह म्हसावद ते बोरनारदरम्यान रेल्वे रूळावर आढळून आला. राजेंद्र पंडित पाथरवट (वय ५५, रा. पाथरी, ता. जळगाव) असे मृताचे नाव आहे.

राजेंद्र पाथरवट गावाजवळील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करून कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. शनिवारी (ता. १२) सकाळी अकराच्या सुमारास ते घरात कोणाला काहीही एक न सांगता घरातून निघून गेले. घरच्यांना ते कामावर गेले असावेत, असे वाटले. (Senior citizen dies under running train Jalgaon News)

रात्री पाथरवट घरी परतले नाहीत. रविवारी सकाळी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा गावात शोध घेतला असता, त्यांना म्हसावद ते बोरनारदरम्यान अनोळखी व्यक्तीच्या आत्महत्येची माहिती मिळाली.

काही ग्रामस्थांनी त्यांचा मुलगा चेतन याला सोबत घेऊन शासकीय रुग्णालय गाठले. मुलाने वडिलांची चप्पल आणि अंगातील शर्टावरून ओळख पटविली. याबाबत एमआयडीसी पोलिसांत आकस्किमक मृत्यूची नोंद झाली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, चार मुली, मुलगा, जावई असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : 'मुरासू' चक्रीवादळ निवळताच पावसाने घेतली माघार; राज्यात उन्हाचा चटका वाढला, तापमान ३७ अंशांपर्यंत पोहोचले

Personal Growth: स्पर्धेतून बाहेर पडा!

Arogya Diwali: आरोग्य दीपावली

Raju Shetti: ६१ तासांनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मागे; उसाला ४,२०० रुपयांपर्यंत दर

Diwali Celebration: दीपावली - उत्सव प्रकाशाचा, उत्सव आनंदाचा

SCROLL FOR NEXT